सांगोला :
सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते तसेच राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदाभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त दि.३ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच सायं.४ वा.सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज येथे ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या किर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर रविवार दि.३० जुलै रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे सकाळी ९ ते ११ यावेळेत सांगोला तालुका स्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामध्ये तीन वयोगटामध्ये क्रमांक काढले जाणार असून प्रत्येक गटातील पहिले बक्षीस सायकल,द्वितीय बक्षीस स्मार्टवॉच, तृतीय बक्षीस स्कूलबॅग व उत्तेजनार्थ बक्षीस जेवणाचा डबा व रंगपेटी असणार आहे. तसेच यामध्ये पहिली ते तिसरीच्या वयोगटासाठी सहभागी विद्यार्थ्यास आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहे.
या रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वाटप हे गुरुवार दि.३ ऑगस्ट रोजी सायं.४ वा.सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमा अगोदर करण्यात येणार असल्याची माहिती आनंदा माने अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली.
—————————————————————————
More Stories
सांगोला राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० कि.मी.खुल्या गटात युपीचा मनुकुमार प्रथम
सांगोला नगरपालिकेकडून मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक बायपास मार्गावर डेकोरेटिव्ह लाईट उभारणी
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून दिघंची जिल्हा हद्द ते वाणीचिंचाळे-भोसे रस्त्यासाठी ३४२ कोटी मंजूर