मुंबई : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची सेना आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सेना यांच्यात मुंबईत दसरा मेळावा घेण्याविषयी चांगलाच संघर्ष पेटलेला असताना,ठाकरे गटाने केबीसी मैदानासाठी दिलेला अर्ज आता फेटाळण्यात आला असून शिंदे गटाला मात्र हिरवा कंदील दिल्याने शिंदे गटात जल्लोष तर, ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे,उध्दव ठाकरे आपला दसरा मेळावा आता कुठे घेणार ? असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत दोन्ही गटाला परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे सेनेकडून खा.अरविंद सावंत यांनी तर,मुख्यमंत्री शिंदेसेनेकडून भारत गोगावले यांनी एमएमआरडीए कडे बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेण्याबाबत परवानगीसाठी अर्ज दिला असता,मुंबई महानगर प्रादेशिक विकास महामंडळाने ठाकरे गटाचा परवानगी अर्ज फेटाळून लावत शिंदे गटाला मात्र मेळावा घेण्याची परवानगी दिली असल्याने शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्याबाबत बाजी मारली आहे तर, ठाकरे गटाची मात्र पंचायत झाली असल्याचे दिसून येते.
ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला केबीसी मैदानही नाकारले
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक