“खासदार,आमदार डाॅ.खंडागळेंच्या दारी”

 

सांगोला :

        सध्या,खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांचा “खासदार- आमदार आपल्या दारी” या अंतर्गत सांगोला तालुक्यात गांवभेट दौरा चालू असून या दौर्‍यात कांही खाजगी भेटीही घेतल्या जात असून त्याच अनुशंगाने,त्यांनी सांगोल्याचे सुप्रसिध्द स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डाॅ.परेश खंडागळे यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिल्याने
“खासदार,आमदार डाॅ.खंडागळेंच्या दारी”अशीही चर्चा होवू लागली आहे.

सांगोला तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार शहाजीबापू पाटील यांनी संयुक्तपणे “खासदार-आमदार आपल्या दारी” या अंतर्गत सांगोला तालुक्यातील विवीध गांवात बुधवारी गांवभेट दौरा आयोजित केला होता. यादरम्यान, त्यांनी सांगोल्याचे सुप्रसिध्द स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डाॅ.परेश खंडागळे यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. त्यावेळी घेतलेल्या छायाचित्रात खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील यांचेसह डाॅ.परेश खंडागळे,डाॅ.स्वाती खंडागळे, डाॅ.परेश यांच्या मातोश्री व पिताश्री लक्ष्मणराव खंडागळे इत्यादी
—————————————————————————