महत्वाच्या बातम्या

विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त सांगोल्यात विविध कार्यक्रम

 

सांगोला :

विश्वरत्न,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त सांगोला शहरातील भीमनगर येथे मंगळवार दि.११ एप्रिल ते मंगळवार दि.२५ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

मंगळवार दि.११ एप्रील रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त सकाळी ९.३० वा.भीमनगर मधील नगरपरिषदेत काम करणार्‍या कर्मचाऱ्यांच्या हस्ते क्रांतिज्योती ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.गुरुवार दि.१३ एप्रिल रोजी रात्री १२ वा. तहसीलदार अभिजीत पाटील,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,गटविकास अधिकारी आनंद लोकरे तसेच न.पा. चे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या शुभहस्ते विश्वशांतीदूत, तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न,भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन १४ तोफांची निळी सलामी देण्यात येणार आहे.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. सांगोला शहरातून निघणार्‍या भव्य प्रभात फेरीचे उदघाटन भीमनगर मधील सांगोला नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तसेच सकाळी ९.३० वा.समस्त सैनिक दलांचे संचलन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व धम्मध्वजास मानवंदना,सकाळी १० वा.भिमनगर मधील जयंती उत्सव मंडपातील सिंहासनस्थ मूर्तीचे पूजन व पंचशील ध्वजारोहण,सकाळी १०.३० वाजता आमदार शहाजीबापू पाटील तसेच माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील,शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख,आजी-माजी नगराध्यक्ष व आजी-माजी नगरसेवक तसेच सांगोला तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास सामुदायिक पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तर, सायंकाळी ४ वा.विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिंहासनस्थ मूर्तीची व प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवार दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम घेण्यात येणार असून सोमवार दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा.लेझीम व झांज पथक, मंगळवार दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता विद्रोही काव्यसमेलन तर, बुधवार दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा.प्रा.डी. आर.ओहोळ (राष्ट्रीय महासचिव, बामसेफ,दिल्ली) यांचे “भारतीय संविधान मूलनिवासी बहुजन समाजाचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा” यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार दि.२० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा.मा.प्रा.त्र्यंबक मोरे सर यांचे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण” या विषयावर व्याख्यान तसेच शनिवार दि.२२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. अँड.विश्वास कश्यप (ज्येष्ठ विधीज्ञ, मुंबई उच्च न्यायालय) यांचे “बौद्धांची सध्याची परिस्थिती” या विषयावर व्याख्यान तर रविवार दि.२३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा.अंधश्रद्धा निर्मूलन वर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आरोह रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रस्तुत “जल्लोष भीमाचा” हा कार्यक्रम आणि मंगळवार दि.२५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button