सांगोला :
सांगोला नगरपरिषदेच्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत, नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्रमांक – २० या शॉपिंग सेंटरमधील गाळा क्रमांक – ६ हा थकीत भाडे व कराच्या रकमेपोटी काल सिल करण्यात आला असून नगरपरिषदेकडून थकबाकीदारांचे गाळे व मालमत्ता सिल करण्यास सुरुवात करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने विशेष वसुली मोहीम राबविण्याबाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून वारंवार आढावा व सूचना देण्यात येत असून त्या अनुशंगाने,सांगोला नगरपरिषदे मार्फत कर वसुलीसाठी मागील दोन महिन्यांपासून विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष वसुली मोहिमेचाच एक भाग म्हणून सौ.माधुरी पांडुरंग चव्हाण यांच्या नांवे भाडेपट्टा पद्धतीने देण्यात आलेला आरक्षण क्रमांक – २० मधील नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटरमधील गाळा क्रमांक – ६ हा थकीत भाडे व कराच्या रकमेपोटी काल सिल करण्यात आला असून सदर गाळ्याची थकीत रक्कम ३१ मार्च २०२३ अखेर न भरल्यास गाळा नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कर निरीक्षक तृप्ती रसाळ, सहा.मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्निल हाके,इम्रान शेख,सिद्धेश्वर बनसोडे, आनंद हुलजंतीकर,ओंकार उकळे, रमेश मोरे यांनी ही कारवाई केली.
—————————————————————————
न.पा.कडील थकबाकी न भरणाऱ्यांच्या मालमत्ता सिल करण्यात येणार :
गाळेधारक व नागरिकांना थकबाकी रकमांच्या वसुलीसाठी नगरपरिषदेकडून वारंवार सूचना देऊनही थकबाकीच्या रकमा न भरणाऱ्यांकडील मालमत्ता सिल करण्यात येणार आहेत.तरी,सर्व मालमत्ताधारकानी लवकरात लवकर कर भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे व कटू कारवाई टाळावी. – मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने