सांगोला :
सांगोला तालुक्यातील जवळा,सोनंद,हलदहिवडी, वझरे,गळवेवाडी व डोंगरगाव या ६ ग्रामपंचायतींमधील ६ रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सध्या राबविण्यात येत असून तालुक्यातील ६ ग्रामपंचायती मधील पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथील प्रभाग क्र.१ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव या प्रवर्गातील गोदाबाई बट्टू कुंभार, वझरे येथील प्रभाग क्र.२ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातील कल्पना लक्ष्मण चव्हाण, सोनंद येथील प्रभाग क्र.४ मधील सर्वसाधारण प्रवर्गातील राहुल विलास काशीद,गळवेवाडी येथील प्रभाग क्र.३ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रवर्गातील स्वाती कुंडलिक गळवे,जवळा येथील प्रभाग क्र.३ मधील सर्वसाधारण स्त्री राखीव मधील रुक्मिणी अरुण साळुंखे तसेच डोंगरगाव प्रभाग क्र.२ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्गातील गणेश तातोबा राजगे यांचे निधन झाल्याने एकूण ६ ग्रामपंचायतमधील ६ सदस्यांच्या रिक्त जागेसाठी सदर पोटनिवडणूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
निधन झालेल्या तसेच राजीनामा अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या तसेच सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४२ दि.२६ ऑगस्ट २०२२ च्या कलम ७ नुसार थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या अधिनियमातील तरतुदीनुसार पोटनिवडणुका विहित मुदतीत घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कारणामुळे रिक्त झालेल्या जागांची माहिती आयोगाच्या ५ जानेवारी २०२३ च्या पत्राअन्वये मागविण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील २ हजार ७४३ ग्रामपंचायत मधील ३ हजार ९१४ सदस्यांमध्ये सांगोला तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या ६ जागेसाठी सदरची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
सांगोला तालुक्यातील ६ ग्रामपंचायतमधील रिक्त जागांसाठी सुरु असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये शुक्रवार दि.२४ रोजी रिक्त जागेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर हरकती घेण्यात येणार असून हरकतीसाठी शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंतचा कालावधी आहे. तर,९ मार्च २०२३ रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.त्यानंतर, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक