शैक्षणिक

सांगोल्याच्या उत्कर्ष विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

सांगोला :

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून हिंदी विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी,यासाठी ज्ञानदा कुलातर्फे सांगोला येथील उत्कर्ष विद्यालयात नुकताच हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

हिंदी दिनानिमित्त उत्कर्ष विद्यालयात हिंदी निबंध स्पर्धा व हिंदी सुलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.हिंदी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची भाषणे तसेच हिंदी कविता पठण व हिंदी साहित्य लेखक प्रेमचंद यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली.तसेच हिंदीचे महत्त्व पटवून देणारे नाटक व हिंदी व्याकरणावर आधारित गीत याचे इ.५ वी ते ९ वी मधील कांही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ.नवनाथ शिंदे सर हे उपस्थित होते.भारत हा बहुभाषिक देश आहे.त्यामुळे आपल्याला विविध भाषा शिकल्या पाहिजेत,परंतु भारतामध्ये सर्वांना जास्त ओळखीची वाटणारी कोमल भाषा म्हणजेच आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे,असे सांगून त्यांनी हिंदी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.भाषा समृद्ध असेल तरच मनुष्य जीवनात प्रगती करु शकतो. म्हणूनच भाषेची श्रवण,भाषण, वाचन व लेखन ही कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करुन भाषा समृद्ध करावी,असे सांगून विविध मूल्ये रुजवणारी नावाजलेली शाळा म्हणजेच उत्कर्ष विद्यालय,असे सांगत नवनाथ शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले. यावेळी,उत्कर्ष विद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आठवड्यातील कोणताही एक दिवस पूर्णपणे हिंदी बोलण्याचा संकल्प करा,असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील वैभवी लवटे व मनस्वी मिसाळ या विद्यार्थिनींनी केले.हिंदी दिनाचा हा कार्यक्रम उत्कर्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक भोसले सर, हिंदी विभाग प्रमुख व पर्यवेक्षक मिसाळ सर,ज्ञानदा कुल प्रमुख सपताळ मॅडम,हिंदी विषय शिक्षिका सर्वगोड मॅडम,मुलाणी मॅडम यांच्या सहकार्याने व ज्ञानदा कुलातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात पार पडला.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button