सांगोला :
धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे,या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील धनगर समाजाकडून नुकतेच सांगोला पंचायत समिती समोर, अनकढाळ टोळनाका व घेरडी अशा विवीध ठिकाणी शेळ्या- मेंढ्यांसह रास्ता रोको करण्यात आले.या रास्ता रोको आंदोलनात धनगर समाजाच्या नेतेमंडळींसह,समाज बांधव,महिला,युवक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी इतर समाजबांधव व अनेक संघटनांनीही धनगर समाजाच्या या आंदोलनास पाठिंबा दिला.एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी सांगोला तालुक्यातील धनगर समाज हा अतिशय आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून येत होते.
या रास्ता रोको आंदोलना दरम्यान सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येवून सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास भविष्यात महायुतीचे सरकार येवू देणार नाही,असा इशाराच धनगर समाजाच्या नेतेमंडळींनी आपल्या वक्तव्यातून दिला.धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा,या मागणीसाठी सांगोला तालुक्यात एकाच दिवशी विवीध ठिकाणी धनगर समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात धनगर समाज शेळ्या-मेंढ्यांसह रस्त्यावर उतरल्याने मिरज-पंढरपूर हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक बराचवेळ विस्कळीत झाली होती.
हे सरकार,धनगर समाजाला फक्त आश्वासन देत असून एसटीमध्ये समावेशाच्या आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. सरकारने यावर गांभीर्याने विचार न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी यावेळी दिला.रास्तारोको आंदोलनात समाज बांधवांनी गजीढोल हे पारंपारिक नृत्य सादर करुन आरक्षण मिळावे,या मागणीसाठी शासनाला धारेवर धरले.राज्यातील धनगर समाजाला घटनेने अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले आहे.मात्र, राज्यकर्त्यांच्या निष्क्रीय भूमिकेमुळे व नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील आदिवासी असलेला धनगर समाज कायम अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित राहिला आहे. “धनगर समाजाने आम्हाला मतदान करुन सत्ता दिली तर,आम्ही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ”,असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.मात्र,सत्ता मिळाल्यानंतर राज्यकर्त्यांनी आरक्षणाबाबत टाळाटाळ करण्यात सुरुवात केली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची गरज असताना धनगर समाजासाठी विविध योजना मंजूर करुन तोंडाला पाने पुसली जात आहे.आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने समिती स्थापन करण्याचे नाटक केले जात आहे.मात्र,या सर्व योजना आणि समितीवर धनगर समाज भाळणार नाही.धनगर समाजासाठी हक्काचे अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा,धनगर समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अनेक मान्यवरांनी यावेळी बोलताना दिला.
या रास्ता रोको आंदोलनात पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख,शेकापचे युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख,माजी नगरसेवक आनंदा माने, उद्योगपती बाळासाहेब एरंडे,माजी जि.प.सदस्य अॅड. सचिन देशमुख,दादासाहेब लवटे,विष्णू देशमुख, बापूसाहेब ठोकळे,डॉ.विजय बंडगर,मनोज ढोबळे, परमेश्वर कोळेकर,उल्हास धायगुडे,अरविंद केदार, सुर्यकांत मेटकरी,शिवाजी शेजाळ,अजित गावडे, आण्णासाहेब मदने,अॅड.धनंजय मेटकरी,आनंद मेटकरी,गोरख पांढरे,अमोल खरात,दत्तात्रय जानकर, दादासाहेब माने,डॉ.दादाशेठ जगताप,संतोष बेहेरे, संजय शिंगाडे सर,रवि मेटकरी, बालाजी येडगे,दिलीप जानकर,नवनाथ शिंगाडे,डॉ.महेश राऊत,डॉ.अभिजीत सोनलकर,अॅड.शंकर सरगर,कोंडीबा सिद,रावसाहेब अनुसे,शिवाजी वाघमोडे,भगवान कारंडे,संतोष कारंडे, दामू मोरे,कल्याण लुबाळ,अक्षय आगलावे,महेश बंडगर,तुकाराम भुसनर,अशोक गावडे,मायाप्पा यमगर, शंकर चौगुले,संतोष चौगुले,शेखर बंडगर,पोपट गडदे, श्रीमत गवंड,हरिभाऊ सरगर,बिरा आलदर,संजय सरगर,राजेंद्र बंडगर,रवि बंडगर,दत्ता लोखंडे,विठ्ठल शेळके,सुभाष कोकरे,सुनिल चोरमुले,आनंदा कोकरे, रामा चोरमुले,अमित खरात,अमित शेंबडे,बाळकृष्ण कोकरे,आबा पाटील,योगेश देवकुळे,समाधान वाघमारे, संदिप धायगुडे,विवेक देशमुख,ज्ञानेश्वर इमडे,आकाश व्हटे,शंकर मेटकरी,आनंदा तंडे यांच्यासह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
——————————————————————————
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली