जिल्हास्तरीय अॅक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक शालेय स्पर्धेत कडलासच्या बहुउद्देशीय प्रशालेचे उज्वल यश
सांगोला :
सोलापूर जिल्हा परिषद व सांगोला तालुका क्रीडा संकुल समिती,सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय अॅक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सांगोला तालुक्यातील कडलासच्या कै.हनुमंतराव आनंदराव पाटील विद्या विकास मंडळ संचलित,बहुउद्देशीय प्रशालेने उज्वल यश संपादन केले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने या शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असल्यामुळे या स्पर्धेत जिल्ह्यातून बार्शी,करमाळा,माढा,पंढरपूर,मंगळवेढा व सांगोला इत्यादी तालुक्यातून वेगवेगळ्या गटातून मुले व मुली मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक डॉ.भारत इंगवले सर व विनायक इंगवले सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्षा अनुराधा पाटील,मुख्याध्यापिका संगीता शिंदे मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
————————————————————
बहुउद्देशीय प्रशालेच्या खालील विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड :
* १९ वर्षाखालील मुली :
१) रेखा पोपट गायकवाड (इ.१०वी)
२) श्रावणी धनंजय तेली (इ.६ वी)
३) तृष्णाई भाऊसाहेब गुरव (इ.७ वी)
* १९ वर्षाखालील मुले :
१) प्रथमेश विनायक श्रीराम (इ.१० वी) २) प्रथमेश शिवाजी क्षिरसागर (इ.९ वी) ३) आशुतोष शरद गायकवाड (इ.७ वी)
४) रामदास संभाजी पवार (१० वी)
५) प्रज्वल विनायक श्रीराम (६ वी)
६) ज्ञानेश्वर मोहन शेटे (९ वी)
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
——————————————————————————