महत्वाच्या बातम्या

सकल मातंग समाजाच्या वतीने आ.शहाजीबापूंचा शुक्रवारी भव्य सत्कार

सांगोला :

                   सांगोला शहरात मातंग समाज स्मृतीभवन बांधण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदार संघातील सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे शुक्रवारी स.११ वा.सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

                     आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या ५ वर्षात सुमारे ५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन तालुक्यातील विकासकामांना चालना दिली आहे.  शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधी उपलब्ध करुन राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.तसेच सर्वच समाजासाठी सभागृह,समाजमंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी मातंग समाजासाठीही सांगोला शहरातील नगरपालिका जागेत स्मृतिभवन बांधण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.यानिमित्ताने सकल मातंग समाजाच्या वतीने आम.शहाजीबापू पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आरक्षण वर्गीकरणाचे जनक विष्णूभाऊ कसबे, विधानपरिषदेचे नूतन सदस्य आमदार अमित गोरखे, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे यांचा विशेष सत्कार सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजन देण्यात येणार आहे.तरी, या कार्यक्रमास सांगोला शहर व तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवांनी उपस्थित रहावे,असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button