महत्वाच्या बातम्या

आम.शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला अपघात

सांगोला :

           सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिस गाडीला अपघात झाला असून या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर,एकाची प्रकृती गंभीर आहे.ही घटना सांगोला तालुक्यातील नाझरा परिसरात गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने नाझरा येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासाठी आ.शहाजीबापू पाटील हे गेले होते. आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून आम.शहाजीबापू हे सांगोला शहराकडे येत असताना शहाजीबापू यांच्या वाहनापुढे पोलिसांचीही एक संरक्षक गाडी (क्र.एमएच १४/डी एम-९४४०) होती.गाड्यांचा ताफा हा माळवाडी-नाझरा (ता.सांगोला) येथे आला असता, पोलिसांच्या गाडीला समोरुन एक दुचाकीस्वार येवून धडकला आणि दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुचाकीवरील दुसर्‍या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button