सांगोला :
छ.शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण करताना बाबर समाजाने अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. पानिपतच्या युद्धात महिपतराव बाबर व त्यांचे बंधू लिंबाजी बाबर यांनी अतुलनीय शौर्य दाखवले.पानिपतच्या पराभवानंतर तब्बल २० वर्षांनी सेनापती गोविंदराव बाबर यांनी अब्दालीचा सहकारी नजीब खान रोहिला याला धडा शिकवला. बाबरांनी अटकेपार आपल्या पराक्रमाचा झेंडा फडकवून स्वराज्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक सिध्दगोंडा पाटील यांनी केले.

शनिवारी १४ जानेवारी रोजी पानिपत शौर्यदिनी पानिपतच्या युद्धात वीरमरण आलेल्या महिपतराव बाबर आणि त्यांचे बंधू लिंबाजी बाबर यांच्या डोंगरगाव (ता. सांगोला) येथील स्मारकाला अभिवादन करताना ते बोलत होते.यावेळी जगदीश बाबर,ॲड. विशालदीप बाबर,संजय बाबर,बाळासाहेब सावंत,संजय काळे,सरपंच उषा पवार, युवराज बाबर, विठ्ठल बाबर, सयाजी बाबर,विजय बाबर, आण्णासाहेब बाबर,जगन्नाथ बाबर,मुख्याध्यापक उतळे गुरुजी व सहकारी राजकुमार बाबर,शरद बाबर,केशव बाबर,प्रताप बाबर,महेश बाबर, विशाल बाबर आदींसह महात्मा फुले विद्यालय,डोंगरगावचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सिद्धगोंडा पाटील म्हणाले, डोंगरगाव आणि परिसरातील हजारो स्वराज्यनिष्ठ सैनिक महीपतराव बाबर आणि लिंबाजी बाबर यांच्यासोबत पानिपतच्या युद्धासाठी गेले होते. यातील दोन्ही बाबर बंधू आणि शेकडो सैन्य दुर्दैवाने या लढाईत मरण पावले. बाबर समाजाचा इतिहास दुर्लक्षित असला तरी तो खुप प्रेरणादायी आहे. इतिहासकार गोपाळराव जाधव आणि प्रवीण भोसले यांनी या समाजाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र, समाजातील तरुणांनी पुढे येऊन आपला ज्वलंत इतिहास सर्वासमोर आणावा,असे आवाहनही शेवटी सिद्धगोंडा पाटील यांनी केले.
———————————————————————
राज्यातील संपूर्ण समाजाची बाबर परिषद भरवणार :
छ.शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा भगवा आकाशात डौलाने फडकावा,म्हणून अनेक पराक्रमी मावळ्यांनी आपले रक्त सांडले आहे. त्यामधे महीपतराव बाबर,लिंबाजी बाबर,सेनापती गोविंदराव बाबर व गंगाजी बाबर यांचे महत्त्वाचे योगदान आहे.बाबर समाजाने स्वराज्यासाठी केलेले कार्य समोर आणून लवकरच राज्यातील संपूर्ण समाजाची बाबर परिषद डोंगरगाव (ता.सांगोला) येथे भरवणार. – जगदीश बाबर
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने