राजकीय

महायुतीची उमेदवारी मिळालेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांचे चिकमहुद येथे शुक्रवारी होणार जंगी स्वागत

सांगोला :

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांचे ए.बी.फाॅर्मसह मुंबईहून चिकमहुद येथे शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी आगमन होणार असून चिकमहुद येथे सकाळी ११ वाजता महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार व स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सत्कार व स्वागत सोहळ्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील मान्यवर,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांचे चिकमहुद येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता आगमन होणार असून त्यानिमित्त सत्कार व स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे.तरी, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.
—————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button