महत्वाच्या बातम्या

सांगोला तालुक्यासाठी २ नवीन पोस्ट ऑफिसची मंजुरी

खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

माढा लोकसभा मतदारसंघात १३ नवीन पोस्ट ऑफिस

सांगोला :

माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे मागणीनुसार केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगोला तालुक्यासाठी २ तर,माढा लोकसभा मतदारसंघासाठी १३ नवीन पोस्ट ऑफिस मंजूर केले असून माढा मतदारसंघात तब्बल १३ नवीन पोस्ट ऑफिसेस सुरु होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे नुकतीच भेट घेऊन माढा मतदारसंघात नवीन पोस्ट ऑफिसेस सुरु करण्यासंदर्भात केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला यश मिळाले आहे.या संदर्भात बोलताना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की,ग्रामीण भागातील सामान्य माणसाला केंद्र सरकारच्या विविध योजना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात,यासाठी या पोस्ट ऑफिसेस महत्त्वाची भूमिका बजावतील.माढा मतदारसंघासाठी नवीन १३ पोस्ट ऑफिसेस मंजूर केल्याबद्दल केंद्रीय संचार मंत्री नाम. ज्योतिरादित्य शिंदे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभारही मानले.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा,पत्र व्यवहार,आधार लिंकिंग,विमा योजना व इतर टपाल सुविधा गावाजवळच उपलब्ध होणार असल्यामुळे शेकडो नागरिकांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार आहे.
—————————————————————————

माढा लोकसभा मतदार संघासाठी मंजूर झालेले नवीन पोस्ट ऑफिस :

* सांगोला तालुका : वाणीचिंचाळे व सोनलवाडी
* करमाळा तालुका : हिवरे व आळजापूर
* माढा तालुका : गवळेवाडी
* माळशिरस तालुका : मारकडवाडी
* पंढरपूर तालुका : पिराची कुरोली व करोळे
* माण तालुका :              कारखेल,हिंगणी,जांभूळनी,  ढाकणी व सोकासन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button