सांगोल्यात डॉ.निकिताताई देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित गौरी गणपती सजावट,रांगोळी व भव्य मोदक स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला : आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व पुरोगामी युवक संघटना,सांगोला यांच्यावतीने डॉ.निकिताताई देशमुख यांच्या संकल्पनेतून सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित केलेल्या भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा,रांगोळी स्पर्धा तसेच भव्य मोदक स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गौरी गणपती सजावट स्पर्धा,रांगोळी स्पर्धा तसेच भव्य मोदक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी ४ सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात संपन्न झाला.यावेळी,व्यासपीठावर श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख,आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख,डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख,महिला सूतगिरणीच्या चेअरमन कल्पना शिंगाडे व सर्व संचालिका,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुजाता पाटील,सुजाता नवनाथ बंडगर यांच्यासह आजी-माजी नगरसेविका व विविध कार्यकारी संस्थेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
गौरी सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक (एलइडी टीव्ही) कविता प्रमोद डोंबे यांनी,द्वितीय क्रमांक (एअर फायर) सीमा संतोष गोंजारी यांनी,तृतीय क्रमांक (मिक्सर) निशा जयराम दौंडे यांनी तर,उत्तेजनार्थ क्रमांक (पैठणी) अनुक्रमे शोभा प्रकाश टकले,राणी दत्तात्रय चांडोले व संगीता मधुकर माळी यांनी पटकाविला.
रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक (सोन्याची नथ) ज्योती अमोल रणदिवे यांनी द्वितीय क्रमांक (चांदीचे नाणे) अहिल्या राणी कोळेकर यांनी तर,तृतीय क्रमांक (चांदीचे नाणे) साक्षी मनोज पवार यांनी पटकावला.
तळणीचे व नाविन्यपूर्ण मोदक या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक (सोन्याची नथ) स्नेहल निलेश मडके,द्वितीय क्रमांक (चांदीचे नाणे) पूनम राजेंद्र नवले यांनी तर,तृतीय क्रमांक (चांदीचे नाणे) स्नेहा निवृत्ती गावडे यांनी पटकाविला.तसेच उकडीचे मोदक या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक (सोन्याची नथ) प्रियंका वैभव सपाटे यांनी,द्वितीय क्रमांक (चांदीचे नाणे) तनुजा सुधीर दौंडे यांनी तर,तृतीय क्रमांक (चांदीचे नाणे) रोहिणी संजय सुरवसे यांनी पटकाविला.यशस्वी सर्व स्पर्धकांना पैठणी,सन्मान चिन्ह देण्यात आले.
मोदक स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पंढरपूर येथील विद्या कैलास करांडे मॅडम,मंगळवेढा येथील प्रा.हर्षश्री वाघमोडे,मंगळवेढा येथील प्रा.पल्लवी भोजने व दिघंची येथील डॉ.दिपाली गजानन मोरे यांनी काम पाहिले.
रांगोळी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अंजली चांदणे, पंढरपूर येथील अदिती बडवे व रोहित जाधव यांनी काम पाहिले.तर,गौरी सजावट स्पर्धेसाठी सुप्रिया देशमुख,वैष्णवी शिंदे,मोहोळ येथील श्रीमती काजल चोरे यांनी तर,पंढरपूर येथील श्रीमती प्रमिला चौगुले यांनी काम पाहिले.
गौरी गणपती सजावट स्पर्धा,रांगोळी स्पर्धा तसेच भव्य मोदक स्पर्धेमुळे महिलांना आपल्या कलागुणांना एक व्यासपीठ मिळाले असून त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.या स्पर्धांमुळे समाजातील महिलांच्या कला आणि गुणांना अधिक प्रसिद्धी मिळाली असून महिलांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली,ज्यामुळे सणाचा उत्साह अधिक वाढला असून यापुढील कालावधीत डॉ.निकीताताई देशमुख यांनी महिलांना वेगवेगळ्या स्पर्धांचे माध्यमातून व्यासपीठ निर्माण करुन द्यावे,अशी अपेक्षाही महिला भगिनींमधून व्यक्त करण्यात आली. या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विद्या रमेश जाधव,स्वाती राजू मगर, निता रामचंद्र ढोबळे,उर्मिला विजय राऊत,स्नेहा अवधूत कुमठेकर,वर्षा दौंडे,स्नेहल बनकर,राजश्री जाधव, कल्याणी सपाटे,जया पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————
महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करुन देवू :
महिलांना कौटुंबिक जबाबदारीशी ताळमेळ साधताना संघर्ष करावा लागतो.महिलांना नेहमीच घरातील जबाबदार्या पार पाडाव्या लागत असतात. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नसतो.यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा,सन्मानाचेे,मनोरंजनाचे व हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने आम्ही या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यापुढेही महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम,स्पर्धां आयोजीत करुन हक्काचे व्यासपीठ निर्माण करुन देवू. – डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख