सामाजिक

शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर व होम मिनीस्टर स्पर्धा

सांगोला :

गणेशोत्सवाच्या कालावधीत दरवर्षी विवीध कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवून गणेशभक्तांचा उत्साह वाढविणारे सांगोला शहरातील कोष्टी गल्लीतील शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे यंदा आपले २५ वे वर्ष साजरे करत असून रौप्यमहोत्सवी वर्षानिमीत्त बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी सकाळी या मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर,मोफत मोतीबिंदू आॅपरेशन व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम तर सायंकाळी होम मिनीस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

सांगोला येथील कोष्टी गल्लीतील शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सांगोला शहर व तालुक्यातील भाविक भक्तांसाठी मंगळवारी २ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.तर बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत बुधरानी हाॅस्पिटल (कोरेगाव पार्क,पुणे) व शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर,मोफत मोतीबिंदू आॅपरेशन व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तसेच बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी खेळ पैठणीचा,होम मिनीस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसाठी फ्रीज,एलईडी टीव्ही,मायक्रोओव्हन,मिक्सर इ.खास आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमासाठी शुभदा उपाध्ये या निवेदिका म्हणून आपली जबाबदारी सांभाळणार असून वरील मोफत नेत्र तपासणी शिबीर व होम मिनीस्टर स्पर्धा या दोन्ही कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा,असे आवाहन शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने संयोजकांनी केले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button