महत्वाच्या बातम्या

सांगोला अर्बन बँकेस रिझर्व्ह बँकेने लावलेल्या मर्यादा उठविल्याने बँकेंची आर्थिक प्रगतीची घोडदौड होणार गतिमान – चेअरमन डॉ.प्रभाकर माळी व सीए के.एस.माळी

सांगोला :

गेल्या २ वर्षापासून सांगोला अर्बन बँकेच्या थकबाकीत व एनपीएत वाढ झाल्यामुळे ठेवीदारांना जास्त व्याजदर देता येत नव्हते.त्याचबरोबर,वैयक्तिक कर्ज मर्यादा कमी केल्याने कर्ज वाटपामध्येही अडचणी येत होत्या.रिझर्व्ह बँकेंच्या सर्व अटी व शर्तींची बॅंकेने आता, पूर्तता केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने सांगोला अर्बन बँकेंस लावलेल्या सर्व मर्यादा उठविल्या असून बँकेची आर्थिक प्रगतीची घोडदौड ही अंत्यत गतिमान होणार आहे,अशी माहिती बँकेचे संस्थापक व चेअरमन डॉ.प्रभाकर माळी तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन तथा सी.ए.के.एस.माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेसाठी बॅंकेचे जेष्ठ संचालक व माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर,माजी उपनगराध्यक्ष सुरेश अप्पा माळी,शिवाजीराव गायकवाड,गोविंद माळी,राजन चौथे,विष्णू लांडगे,रामचंद्र जाधव,संजय खडतरे,सीए संतोष बालटे,डॉ.संगीता पिसे,ॲड.चैत्रजा बनकर व बँकेचे अधिकारी आनंद शिवगुंडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेअरमन डॉ.प्रभाकर माळी पुढे म्हणाले की,सांगोला अर्बन बँकेच्या दि.३१ मार्च २०२५ अखेरच्या सांपत्तिक स्थितीचा व प्रगतीचा लेखाजोखा घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या आथिक वर्षात बँकेने केलेल्या उल्लेखनिय आर्थिक प्रगतीची दखल घेऊन बँकेस सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) मधून बाहेर निघाल्याचे दि.३०/०६/२०२५ च्या पत्राद्वारे कळविले असून ही अतिशय आनंद देणारी बाब आहे.गेल्या वर्षापासून बँकेने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सर्व थकबाकीदारांवर रितसर व कायदेशीर कडक कारवाई करुन वसुली केल्याने थकबाकीचे प्रमाण कमी केले आहे.बँकेची वसुली चांगली झाल्याने व बँकेने उल्लेखनिय प्रगती साधल्याबद्दल रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांनी बँकेचे संस्थापक चेअरमन,बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, सर्व संचालक मंडळ,मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या असून बँकेने भविष्यातही अशीच प्रगती करण्याचे सूचित केले असल्याचे सांगीतले.

           तसेच सांगोला अर्बन बँकेची दि.३१ मार्च २०२५ अखेरची सांपत्तिक स्थिती अतिशय भक्कम व उल्लेखनिय असून या आर्थिक वर्षात बँकेच्या कर्ज पुरवठ्यामध्ये भरीव वाढ व एनपीए खात्याची चांगल्या प्रकारची वसुली झाल्यामुळे नेट एनपीएचे प्रमाण ४.९९ टक्के,भांडवल पर्याप्तता प्रमाण १४.४० टक्के,ढोबळ नफा रु.८ कोटी १४ लाख इतका विक्रमी नफा झाला असून निव्वळ नगद नफा रु.४ कोटी २४ लाख झालेला आहे.तसेच यावर्षी बँकेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचेही त्यांनी सांगीतले.बँकेच्या या प्रगतीला बँकेच्या सर्व सभासद,ठेवीदार,कर्जदार,ग्राहक व हितचिंतकांचेही सहकार्य लाभले आहे.रिझर्व्ह बँकेच्या सर्व अटी व शर्तींची पुर्तता झाल्याने व बँकेस चांगला नफा झाल्याने यावर्षी बँकेच्या सभासदांना लाभांश देणेसंबंधी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी व सीए के.एस.माळी यांनी सर्व संचालक मंडळाच्या वतीने अभिवचन दिले होते.बॅंकेकडील सर्व संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेऊन त्याची पूर्तता केली आहे.हे आपणा समोर व्यक्त करताना आम्हा सर्वांना आनंद व समाधान होत आहे. यावर्षीही बँकेच्या प्रगतीची यशस्वी घोडदौड कायम ठेवण्यामध्ये बँकेचे सर्व सभासद,ठेवीदार,कर्जदार, खातेदार व हितचिंतक यांनी मनःपूर्वक सहकार्य करावे,असे आवाहन सर्वांना करत आहे.

तसेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी बँकेंचा वर्धापन दिन असून त्यानिमीत्त ठेवीवर आकर्षक व्याजदरांच्या विविध योजना बॅंक जाहीर करणार आहे.तसेच कमी व्याजदरात वाहन कर्ज वितरीत करण्यासाठी विशेष योजना जाहीर करणार आहे.बँकेने आण्णासाहेब पाटील महामंडळ,ओबीसी महामंडळ अंतर्गत व्यवसायासाठी कर्ज वितरीत करणेसाठी योजना स्वीकारल्या असून त्याचे कर्ज वाटप सुरु आहे. बँकेच्या माध्यमातून बँकेचे सभासद,सांगोला तालुक्यातील सामाजिक,सर्व स्तरातील व्यापारी, व्यावसायिक व नोकरदार या सर्वसामान्य लोकांच्या अडी अडचणीत आर्थिक सहाय्य करुन त्यांच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत, आपण त्याचा लाभ घ्यावा. यासाठी बँकेस व शाखेस भेट देऊन बँकेच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे,असे आवाहन बँकेचे संस्थापक,चेअरमन डॉ.प्रभाकर माळी व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए के.एस.माळी यांनी केले आहे.
——————————————————————————

सोलापूर जिल्ह्यातील डिजीटल सेवा पुरविण्यार्‍या नागरी बँकांमध्ये सांगोला अर्बन बँकेला बहुमान प्राप्त :

आता,नजीकच्या पुढील कालखंडामध्ये सुधारित डिजीटल बँकींगच्या सर्व सुविधा सांगोला अर्बन बँकेंमार्फत सुरु करण्यात येणार आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने मोबाईल बँकिंग,नेट बँकिंग,शासकिय लाभ योजना (नॅच) यांचा समावेश हा बँकेंस युपीआय व आयएमपीएस सुविधांना रिझर्व्ह बँकेंकडून मंजूरी प्राप्त होत आहे.या डिजीटल सेवा पुरविण्यार्‍या सोलापूर जिल्ह्यातील नागरी बँकांमध्ये सांगोला अर्बन बँकेला बहुमान प्राप्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button