वैद्यकिय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविणारे सांगोल्याचे डॉ.परेश खंडागळे

सातत्याने मोफत तपासणी शिबीर व शस्त्रक्रिया शिबीराद्वारे रुग्णांची अविरत सेवा

सांगोला :

        वैद्यकिय क्षेत्र हे केवळ उत्पन्नाचे साधन न मानता, गरीब व गरजू रुग्णांना विनामोबदला व तात्काळ औषधोपचार करण्यासाठी तत्परता दाखविणारे आणि सांगोला येथील आपल्या खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या निमीत्ताने सातत्याने मोफत सर्वरोग तपासणी शिबीर व मोफत शस्त्रक्रिया शिबीराद्वारे रुग्णांची अविरत सेवा करत अल्पावधीत वैद्यकिय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही डॉ.परेश खंडागळे यांनी आपला ठसा उमटविला आहे.

                   सांगोला येथील खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने डॉ.परेश खंडागळे व त्यांच्या धर्मपत्नि डॉ.स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त २८ मे,७ जून व यापूर्वीही अनेकवेळा खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांनी सांगोला येथील खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत सर्व रोग निदान शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रियांचा उपक्रम राबविला असून विशेष प्रसंगी,हॉस्पिटल मधील रुग्णांकडून एक रुपयाही बील न घेता हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा दिल्या आहेत.

डॉ.परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.९ जुलै रोजीही मोफत सर्व रोग निदान शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर हॉस्पिटलमधील रुग्णाचे एक रुपयाही बिल घेतले जाणार नाही.या शिबीरामध्ये रुग्णांच्या तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत.या शिबीरामध्ये रुग्णांना हॉस्पिटलचा एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत.यामध्ये सिझेरियन,प्रसुती त्याचबरोबर सर्व फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.अ‍ॅपेंडिक्स,हार्निया,फिशर, गर्भाशय पिशवी काढणे,मुतखडा,प्रोस्टेट,दुर्बिणीद्वारे कांही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.रुग्णांना फक्त हॉस्पिटलमध्ये मेडिसीन,भूल व रक्ताच्या चाचण्यांचा खर्च करावा लागणार आहे.कान-नाक-घसा या संदर्भातील शस्त्रक्रियांमध्येही सवलत दिली जाणार आहे.

           तसेच खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना,महात्मा फुले जनआरोग्य योजना,प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या योजनेतंर्गत सांगोला शहर व तालुक्यासह आजुबाजूच्या तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना कायमस्वरुपी मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.आत्तापर्यंत गेल्या १२ वर्षांमध्ये अनेक मोफत शस्त्रक्रिया व उपचार केले आहेत.त्याचप्रमाणे अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांनी जवळपास ८०० नॉर्मल प्रसुती मोफत केल्या आहेत व गोरगरीब रुग्णांना कमीत कमी दरात उपचारही केलेले आहेत.

आज बुधवारी ९ जुलै रोजी खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी,सर्वरोग निदान तपासणी तसेच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यासह आजुबाजूच्या तालुक्यातील गोरगरीब रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांनी केले आहे. ——————————————————————————