सामाजिक

आम.डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिताताई देशमुख यांनी केली वारकरी बांधवांची सेवा

वारकरी बांधवांच्या आरोग्याची तपासणी करुन जपली सामाजिक बांधिलकी

सांगोला :

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले असताना पायी वारीत वारकर्‍यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी वाखरी (ता.पंढरपूर) येथे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नि डॉ.निकिताताई देशमुख यांनी पुढाकार घेऊन वारकरी बांधवांच्या आरोग्याची तपासणी करुन सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वापुढे एक आदर्श निर्माण केला.

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम वारकर्‍यांची मने जिंकणारा ठरला. राजकारणापेक्षा समाजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी स्थान मिळविले आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधांसोबतच त्यांच्या आरोग्याचीही ते काळजी घेत असतात.

त्याच दृष्टीकोनातून वाखरी येथे पंढरीत जाण्यापूर्वी थकलेल्या भाविकांची सेवा व वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिताताई देशमुख यांनी कोणताही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने वारकर्‍यांच्या आरोग्याची विचारपूस करुन तपासणी केली.
यावेळी त्यांनी अनेक वारकरी बांधवांच्या आरोग्याची तपासणी करुन औषधे दिली.पायी चालण्यामुळे वारकर्‍यांना होणारे स्नायू विकार,ताप,थकवा, डोकेदुखी,पायांची सूज अशा तक्रारींसाठी यावेळी तात्काळ औषधोपचार करण्यात आले.

खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीची वाट चालणार्‍या हजारो वारकर्‍यांची आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिताताई देशमुख यांनी तपासणी केली.११ वेळा आमदार होवून गेलेल्या तरी, अत्यंत साधेपणा जपलेल्या स्व.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा प्रथमच आमदार झालेले डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकीताताई देशमुख हे पती-पत्नी आपल्या कार्यातून पुढे नेत असल्याचे उपस्थित वारकरी बांधवांमधून बोलले जात होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button