महत्वाच्या बातम्या

स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत सांगोला तालुक्यातील ६ गावांचा नव्याने समावेश – माजी आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला :

        सांगोला तालुक्यातील नरळेवाडी,वाकी (शिवणे), शिवणे,एखतपूर,सांगोला व कमलापूर या ६ गांवांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेमध्ये तालुक्यातील सहा गावांचा नव्याने समावेश करुन या गावातील शेतीसाठी पाणी देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले असल्याची माहिती सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.

                 महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत सांगोला तालुक्यातील सहा गांवे नव्याने समाविष्ट करण्यात आली असून यामध्ये नरळेवाडी,वाकी (शिवणे),शिवणे,एखतपूर, सांगोला,कमलापूर या गावांचा समावेश आहे.यामुळे या गावातील शेतीला कायमस्वरुपी हक्काचे पाणी मिळणार असल्याने या भागातील शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे.माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांची शेतीसाठी असलेली पाण्याची मागणी पूर्ण होत आहे. भविष्यात या गावातील शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे,अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button