सामाजिक

मजूर महिलेच्या मदतीला धावून आली आपुलकी

डॉ.अमर शेंडे यांनी केली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

सांगोला : 

जिथे काम मिळेल तिथे जायचे,रोजंदारी करुन पोट भरायचे,त्यातच १० वर्षापासून शारीरिक त्रास,परंतु घरी सांगायचे कसे ? या विवंचनेत असतानाच जास्त त्रास होऊ लागल्यानंतर मात्र हॉस्पिटलला जावेच लागले आणि डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऑपरेशन करावे लागेल,असे सांगितल्यानंतर पायाखालची वाळू सरकली.मात्र मोलमजुरी करणाऱ्या या महिलेच्या मदतीला आपुलकी धावून आली. त्याचबरोबर,डॉ.अमर शेंडे यांनी गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळे तिचे जगणे आता सुकर झाले आहे.

   मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले पवार कुटुंबीय गेल्या २ वर्षापासून मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करण्यासाठी सांगोला तालुक्यात आले आहेत. गेल्या १० दिवसांपूर्वी बामणी येथे काम चालू असताना बेबाबाई नामदेव पवार यांना जास्तच त्रास होऊ लागल्याने त्यांनी डॉ.शिवराज भोसले व डॉ.अश्विनी केदार यांच्याकडे जाऊन तपासणी केली असता,ऑपरेशन शिवाय पर्याय नाही,असे त्यांनी सुचवले.परंतु मोलमजुरी करणार्‍या व हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाला ऑपरेशनसाठी पैसे आणायचे कुठून ? असा प्रश्न पडला.याची माहिती आपुलकी प्रतिष्ठानला मिळाल्यानंतर आपुलकी प्रतिष्ठानने मदतीचे आवाहन केले व बघता बघता आपुलकी सदस्य व समाजातील दानशूर व्यक्तींकडून आपुलकीच्या सदस्यांनी २४ तासात ३५ हजार रुपये जमा करुन डॉक्टरांकडे सुपूर्द केले. 
——————————————————————————

डॉ.अमर शेंडे यांनी शासनाच्या सवलतीत न बसणाऱ्या व अवघड असलेल्या शस्त्रक्रियेच्या खर्चात मोठी सवलत देऊन गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्याचबरोबर ३ महिन्यांसाठी फेरतपासणी व औषधोपचार नि:शुल्क करणार असल्याचे तसेच यापुढे या महिलेला असा त्रास पुन्हा कधीही होणार नाही,असे डॉ.शेंडे यांनी यावेळी सांगितले.

—————————————

बेबाबाई पवार यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंगळवारी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करतेवेळी डॉक्टर टीम व आपुलकीचे आभार मानताना त्यांना अश्रू अनावर झाले. सांगोल्यातील आपुलकीची माणसं व डॉक्टर टीमने केलेली मदत कुठेही गेलो तरी कायम आठवणीत राहील, असे त्या म्हणाल्या.
—————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button