सामाजिक

कार्यतपस्वी स्व.आम.काकासाहेब साळुंखे-पाटील यांचे पुण्यतिथी निमीत्त आज सांगोला तालुक्यात विविध कार्यक्रम

 

सांगोला :

                    सांगोला तालुक्याचे कार्यतपस्वी आमदार स्व.काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सांगोला शहर आणि संपूर्ण तालुक्यात आज शुक्रवार दि.२८ मार्च रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करुन स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे कार्य करणार असल्याचे ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील यांनी सांगितले.

        दरवर्षी स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या पुण्यतिथी निमीत्त संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात.त्यानुसार यंदाही शुक्रवारी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.महूद बु॥ येथे जि.प.प्रा. शाळा,महूद येथील विद्यार्थ्यांना महूद ग्रामस्थांच्या वतीने शालेय साहित्यांचे व खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.

तसेच एखतपूर ग्रामस्थांच्या वतीने एखतपूर येथील जि.प.प्रा.शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.जवळा ग्रामस्थांच्या वतीने प्राथमिक मुलांची शाळा क्र.१ येथे समस्त ग्रामस्थांसाठी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीरात जवळा व पंचक्रोशीतील सर्व गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि निदान शिबीर आयोजित केले आहे.

                              तर,घेरडी ग्रामस्थांच्या वतीने घेरडी येथील आश्रमशाळा तसेच जि.प. प्रा.शाळामधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.कडलास ग्रामस्थांच्या वतीने जि.प.शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात येईल.नाझरे ग्रामस्थांच्या वतीने जि.प.प्रा.शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ तसेच फळांचे वाटप करण्यात येणार आहे.

आज शुक्रवारी २८ मार्च रोजी कोळा ग्रामस्थांच्या वतीने गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील मातोश्री आश्रमात असणाऱ्या सर्व निराधार लोकांना मोफत आणि रुचकर भोजन देण्यात येणार आहे.तर,सांगोला शहरवासीयांच्या वतीने शहरातील मातोश्री वृद्धाश्रम येथे असणाऱ्या निराधार व वयोवृध्द नागरिकांना भोजनाचे सर्व साहित्य देण्यात येणार आहे.

संपूर्ण सांगोला शहर व तालुक्यात स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त साळुंखे-पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात सामाजिक उपक्रम राबवून स्वर्गीय काकासाहेब साळुंखे-पाटील यांची पुण्यतिथी साजरी करावी,असे आवाहन तानाजीकाका पाटील यांनी केले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button