महत्वाच्या बातम्या

कराड अर्बन बँक ही पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक – आम.डॉ.बाबासाहेब देशमुख

 

सांगोला :

                   कराड अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी,अध्यक्ष डॉ.सुभाष एरम,उपाध्यक्ष समीर जोशी व त्यांचे इतर संचालकांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक यशस्वीपणे वाटचाल करत असून कराड अर्बन बँक ही पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक ठरली असल्याचे कौतुकास्पद उदगार सांगोला विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी काढले.

            कराड अर्बन बँकेच्या सांगोला शाखेस आमदार ‌डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली,त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कराड अर्बन बँकेच्या सांगोला शाखेचे शाखा व्यवस्थापक बसवेश्वर चेणगे यांनी त्यांचे स्वागत व सत्कारही केला.

           यावेळी बोलताना शाखा व्यवस्थापक श्री.चेणगे म्हणाले की,आमच्या बॅंकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी,अध्यक्ष डॉ.सुभाष एरम,उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल लाहोटी,मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव,पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक रवींद्र कांबळे,सोलापूर विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुरज शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आमची बँक ही यशस्वीपणे वाटचाल करत आहे.

याप्रसंगी,शेकापचे कार्यकर्ते बाळासाहेब झपके,ग्राहक समिती सदस्य सचिन लोखंडे,संजय पाटणे,अरुण पाटील तसेच बँक अधिकारी सुरज जाधव,सेवक याकुब शेख,राजेश कटकधोंड,गणेश हिरोळे आदी उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button