सांगोला :
जय मल्हार क्रांती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष दौलतनाना शितोळे व महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत श्री गणेश मंगल कार्यालय (महूदरोड, सांगोला) येथे रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.तरी या सर्वसाधारण सभेस महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संयोजक तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश मंडले यांनी केले आहे.
जय मल्हार क्रांती संघटनेच्या या सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकारी यांच्याही निवडी केल्या जाणार आहेत.त्यासाठी,जय मल्हार क्रांती संघटनेत काम करण्याची आवड असणाऱ्या इच्छुक समाज बांधवांनी ९९२२३९९५८८/ ९७३०३७०८८८ / ९०११२७९९६४
या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. ——————————————————————————
लोकनेते दौलतनाना शितोळे व आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा होणार नागरी सत्कार :
या कार्यक्रमात जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांची उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) निवड झाल्याबद्दल तसेच सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जय मल्हार क्रांती संघटना,महाराष्ट्र राज्य व समाज बांधवांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
More Stories
नामसाधकाने आपल्या जीवनामध्ये श्री महाराजांना केंद्रस्थानी ठेवावे-धैर्यशीलभाऊ देशमुख
आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पाच गरजू महिलांना शेळी व शिलाई मशीन भेट
महूद येथे स्व.गणपतराव देशमुख यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी