सांगोला :
सांगोला तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा सन्मान चिन्ह,सन्मानपत्र, शाल,श्रीफळ,हार,व रवींद्र कदम सर लिखित “आनंदी जीवनाचे सिक्रेट आनंदवेल” हे पुस्तक देऊन सांगोला तालुक्यातील वासूद ग्रामस्थांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात भव्य नागरी सत्कार संपन्न झाला.
या सत्काराच्या सोहळ्यासाठी सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर,सांगोला सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे, सांगोला खरेदी-विक्री संघाचे सर्व संचालक,वासूद गावातील माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी मेंबर व शेकापचे सांगोला तालुक्यातील व वासूद,अकोला गांवातील सर्व नेतेमंडळी,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त याप्रसंगी,जि.प.प्राथ शाळा वासूद,केदारवाडी,बाबर मळा-सपताळ मळा येथील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच अंगणवाडी मधील सर्व मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर,यावेळी आम.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग तपासणी व उपचार शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
या सर्व रोग तपासणी व उपचार शिबिरामध्ये सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मेडिसिन,अस्थिरोग, बालरोग,स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र,नेत्ररोग,सर्जरी व मूत्ररोग,फॅमिली फिजिशियन व सर्जन या विभागातील नामवंत डॉ.प्रसाद साळे,डॉ.यशोदीप गायकवाड,डॉ. एच.व्ही.गावडे,डॉ.राजू जानकर,डॉ.बी.यु.पाटील, डॉ.संतोष पाटील,डॉ.सुधीर ढोबळे,डॉ.विजय बंडगर, डॉ.मेघना देवकते,डॉ.स्नेहल भोसले,डॉ.अमृता लिगाडे, डॉ.दिव्यता केदार,डॉ.सुनील लवटे,डॉ.विजयसिंह भोसले,चंद्रभागा नेत्रालयचे डॉ.तानाजी वाघमोडे व त्यांचा स्टाफ,डॉ.निरंजन केदार,डॉ.जयंत केदार, डॉ.सचिन लिगाडे,संजीवनी लॅबोरेटरीचे प्रवीण कोळेकर,केदार लॅबोरेटरीचे नितीन बंडगर,प्राथमिक आरोग्य केंद्र,अकोला-वासूद येथील डॉक्टर संदीप देवकते व सर्व स्टाफ, आशा सेविका यांनी मोफत आरोग्य सेवा दिली,त्याबद्दल वासूद ग्रामस्थांच्या वतीने वरील सर्व डॉक्टर्स मंडळींचा आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सदर शिबिरामध्ये तब्बल ३१८ रुग्णांनी सहभाग नोंदवून उदंड प्रतिसाद दिला.यासमयी,सुमारे ९२ शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने