राजकीय

जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्त्रोत – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला :

मागील ३५ वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात सांगोला तालुक्यातील जनतेने मला भरभरुन साथ दिली असून माझ्या संपूर्ण आयुष्यात याची उतराई होऊ शकत नाही,इतके माझ्यावर जनतेचे उपकार आहेत.जनतेच्या या पाठींब्यावरच विकास कामांसाठी तब्बल ५ हजार कोटी रुपयांचा निधी आणू शकलो.जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा हेच माझे ध्येय असून जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्त्रोत असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

                 सांगोला तालुक्यातील खवासपूर गावातील विकास कामांसाठी सुमारे ३१ कोटी ८५ लाख रुपयांचा रेकाॅर्डब्रेक निधी दिल्याबद्दल तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल ८८३ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल आणि माण नदीवरील सर्व बंधारे वर्षातून ३ वेळा भरुन देण्याची तरतूद केल्याबद्दल खवासपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.  यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचा तालुक्यातील ८० हजार महिलांना लाभ झाला आहे. तालुक्यातील १ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे माझे उद्दिष्ट आहे. माझ्या ऑफिसला आलेली एकही व्यक्ती आतापर्यंत रिकाम्या हाताने परत गेलेली नाही. माझ्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली.जनतेच्या आशीर्वादावरच मी आजारातून पूर्णपणे बरा झालो असून जनता हेच माझे टॉनिक आहे, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद जरे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख राणीताई माने,ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे,शिवसेना नेते दिग्विजय पाटील,शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे,युवासेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक ऐवळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे,विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे,माजी सरपंच लक्ष्‍मण भोसले,केशर भोसले,बाळासाहेब भोसले, शामराव बागल,सतीश पाटील,राजू गायकवाड,विकी भोसले,सौदागर सावंत,विनोद ऐवळे,आबा ऐवळे, पैलवान धनाजी बोडरे,मुरलीधर जरे,सुरेश जरे,दुर्योधन जरे,जयवंत भोसले,मनीषा भोसले,रोहिणी बागल,हेमा बोडरे,रुपाली गायकवाड,कल्पना जरे,अनिता भोसले, महादेव ऐवळे,शहाजी सावंत,संदीप सावंत,अमोल वाघमारे,दादा माने,संजय भोसले,निलेश भोसले,सतीश पाटील,मधुकर फुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खवासपूर गावामध्ये शिवसेना,युवासेना,शिवसेना मागासवर्गीय आघाडी,शिवसेना महिला आघाडीच्या शाखांचे उदघाटन करण्यात आले.
           ——————————————————————

आ.शहाजीबापूंच्या सत्काराला पडत्या पावसातही बहुसंख्य ग्रामस्थांची हजेरी :

खवासपूर गावाच्या विकासासाठी रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.खवासपूर गावातील आजी-माजी सैनिक,पोलीस अधिकारी, विवीध अधिकारी,डॉक्टर,वकील,शिक्षक,इंजिनियर अंगणवाडी सेविका,आशा वर्कर यांचेवतीने एकत्रित सत्कार करण्यात आला.आमदार शहाजीबापूंच्या सत्कारासाठी पडत्या पावसातही बहुसंख्य ग्रामस्थांनी हजेरी लावली होती.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button