महत्वाच्या बातम्या

सांगोल्यात लोणारी समाज भवन व अभ्यासिकेसाठी आबा-बापूंच्या प्रयत्नाने २ कोटींचा निधी मंजूर

 

सांगोला :

सांगोला नगरपालिका हद्दीत लोणारी समाजरत्न व पितामह विष्णुपंत दादरे यांचे स्मारक,लोणारी समाज सभागृह व अभ्यासिका याकरिता आबा-बापूंच्या प्रयत्नाने २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने लोणारी समाजाने दोन्ही नेत्यांचे आभार मानले आहे.

लोणारी समाजरत्न व पितामह विष्णुपंत दादरे यांचे स्मारकाकरिता,लोणारी समाजाचे सभागृह व अभ्यासिका याकरिता सांगोला नगरपालिका हद्दीत जागा उपलब्ध करुन देण्यात यावी.याकरिता,लोणारी समाजाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते.या उपोषणादरम्यान समाजाच्या वतीने वरील मागण्या करण्यात आलेल्या होत्या.या मागण्यांची दखल प्रशासन व येथील आजी माजी लोकप्रतिनिधींनी (आबा-बापूंनी) घेऊन समाजास नगरपरिषदेच्या हद्दीत आवश्यक ती जागा उपलब्ध करुन देण्याची हमी दिली आहे.

या जागेवर भव्य सभागृह व अभ्यासिका बांधकामा करिता तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील या दोघांनीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नाम.अजितदादा पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे लोणारी समाजाच्या वरील कामांकरिता २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री नाम.अजितदादा पवार यांचेकडे ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा,अशी मागणी १६ ऑगस्ट २०२४ रोजी जोरकसपणे लावून धरली होती.

अखेर,आबा व बापूंच्या प्रयत्नांना यश येऊन लोणारी समाजासाठी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन घेण्यात या दोन नेतेमंडळींना यश आले आहे.त्यामुळे सांगोला तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजाच्या वतीने या दोन्हीही नेते मंडळींचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
तथापि,समाजाच्या वतीने ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून,यातून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले असले तरी, या तालुक्यामध्ये असणारी समाजाची संख्या लक्षात घेता सभागृह व अभ्यासिका नयनरम्य देखणी व टोलेजंग होण्याकरिता हा निधी तुटपुंजा ठरणार असल्याने ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी आजही या समाजाची मागणी आहे आणि उर्वरित निधी लवकरात लवकर समाजास उपलब्ध होईल,अशी आशा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button