महत्वाच्या बातम्या

सांगोला शहरातील १४ विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला :

          सांगोला शहरात लोणार,मातंग,रामोशी,चर्मकार, हटकर,शिंपी,महर्षी वाल्मिकी कोळी व नाभिक समाजासाठी समाजमंदिर आणि सभागृह बांधणे, व्यापारी संकुल बांधणे,मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे अशा विवीध १४ विकास कामांसाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खास बाब म्हणून सुमारे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या ५ वर्षात सुमारे ५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन सांगोला तालुक्यातील विकास कामांना चालना दिली आहे.  शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधीही उपलब्ध करुन राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.तसेच सर्वच समाजासाठी सभागृह,समाजमंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

सांगोला शहरातील खालील विवीध १४ विकास कामांसाठी सुमारे २० कोटी रुपये मंजूर : 

सांगोला नगरपालिका हद्दीत लोणार समाजासाठी सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधणे यासाठी २ कोटी रुपये,नगरपालिकेच्या जागेत मातंग समाजासाठी स्मृतिभवन बांधणे यासाठी १ कोटी रुपये,नरवीर उमाजी नाईक रामोशी समाजासाठी नगरपालिका हद्दीत समाजमंदिर बांधणे यासाठी १ कोटी रुपये,खारवटवाडी येथे नगरपालिका जागेत चर्मकार समाजासाठी समाजमंदिर बांधण्यासाठी ५० लाख रुपये,नगरपालिकेच्या जागेत हटकर समाजासाठी समाजमंदिर बांधण्यासाठी १ कोटी रुपये,शिंपी समाजासाठी नगरपालिका जागेत समाजमंदिर बांधण्यासाठी ५० लाख रुपये,सांगोला येथील मिरज रोडवरील नाभिक समाजमंदीराचा तळमजला बांधणेसाठी ५० लाख रुपये,नगरपालिका जागेत यलमार समाजासाठी सभागृह बांधण्यासाठी १ कोटी रुपये,नगरपालिका जागेत महर्षी वाल्मिकी कोळी समाजमंदिर बांधणेसाठी १ कोटी रुपये,लोहार गल्ली येथील आरक्षण क्रमांक ४ मध्ये मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणेकरिता २ कोटी ५० लाख रुपये,सिटी सर्व्हे क्रमांक २५८५ येथे सुधारणा करणेकरिता ५० लाख रुपये,छत्रपती शिवाजी महाराज चौक धान्य बाजार या ठिकाणी व्यापारी संकुल बांधणेसाठी ५ कोटी रुपये,सांगोला नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर अनुषंगिक कामे करणेकरिता ३ कोटी रुपये,अशा १४ विवीध विकास कामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button