सांगोला :
श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा १११ वा पुण्यतिथी उत्सव हा सांगोला येथील श्रीराम मंदिर व ध्यानमंदिर येथे दि.१६ ते २५ डिसेंबर या दरम्यान मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला.
यानिमित्त भीक्षा,भजन,मौन,गायन,कीर्तन,प्रवचन, उपासना,अखंड १३ तासाचा जप इ.कार्यक्रम पार पडले.राममंदिर येथे दररोज सकाळी ६ वा.काकडा आरती व सामुदायिक जप इ.कार्यक्रम संपन्न झाले.

पंढरपूर येथील ह.भ.प.डॉ.जयवंत महाराज बोधले यांची “राम म्हणता रामची होईजे” या विषयावर ३ दिवस सुश्राव्य अशी प्रवचन माला संपन्न झाली. तसेच सज्जनगड येथील सेवेकरी ह.भ.प.श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे यांचे नारदीय कीर्तन झाले.तर, ह.भ.प.श्री.गुरुनाथ महाराज कोटणीस,सांगली यांचे प्रवचन त्याचबरोबर दयानंद बनकर व त्यांचे सहकाऱ्यांचा भजन संध्या हा भावगीत,भक्तीगीत, अभंग व गौळणीचा बहारदार कार्यक्रमही संपन्न झाला.
बुधवारी श्रीमती शुभांगी कवठेकर यांचे पुण्यतिथीचे कीर्तन व श्रीमहाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.श्रीमती कवठेकर यांना तबल्याची साथ श्रीया कुलकर्णी यांनी तर,हार्मोनियम साथ शशिकांत लाटणे यांनी दिली.यावेळी सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले.यानंतर महाराजांची पालखी व नगर प्रदक्षिणा शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली. तसेच दुपारी ध्यानमंदिरात आरती व महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता करण्यात आली.
—————————————————————————
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला देणगीदारांचा मोठा हातभार
भीमनगर प्राथ.शाळेत छ.शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
स्व.छबूताई गायकवाड यांच्या रक्षा विसर्जनादिवशी वृक्षारोपण करुन अस्थिचे विसर्जन