महत्वाच्या बातम्या

समृध्द गाव अभियान सक्षमपणे राबवणार – आ.सुभाषबापू देशमुख

सांगोला येथे स्नेहसंवाद संपन्न

सांगोला :

सोलापूर जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने व सहभागातून समृध्द गांव अभियान प्रभावीपणे राबवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकारमंत्री व दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख यांनी केले. सांगोला येथे आयोजित स्नेहसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना आ.सुभाषबापू देशमुख पुढे म्हणाले की,सोलापूर जिल्हयामध्ये कृषी,सहकार,पर्यटन, उदयोग,शिक्षण,आरोग्य अशा सर्वच क्षेत्रामध्ये प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेवून सोलापूर जिल्हयाचे नांव महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्टाच्या बळावर नंदनवन फुलविले आहे. सांगोला तालुक्यातील उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ व भाव मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी  सांगितले.

             याप्रसंगी,सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल आपुलकी प्रतिष्ठानचा सन्मान करण्यात आला.यावेळी, युवा नेते अॅड.गजानन भाकरे,पोपट बंडगर,मोहन मिसाळ,संजय तोडकरी,दादा खडतरे,तानाजी केदार यांनी आपले विचार व्यक्त केले.यासमयी विजय कुलकर्णी,सी.ए.उत्तम बनकर,डॉ.शिवराज भोसले, लोकमंगल बँकेचे शाखाधिकारी प्रविण भोसले व पतसंस्थेचे शाखाधिकारी दत्तात्रय दिवसे,तसेच कर्मचारी व सांगोला तालुक्यातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव लांबोरे यांनी व सूत्रसंचलन शंभू माने यांनी केले तर, आभार विजय कुलकर्णी यांनी मानले.
————————————————————

सांगोला तालुक्यात लोकसहभागातून ७ हजार ७oo वह्यांचे वाटप करणार  :

आ.सुभाषबापू देशमुख यांच्या सत्कारासाठी हार,फेटे,शाली या पेक्षा वह्या आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते,या आवाहनास सांगोलेकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बापू ७७ हजार मताधिक्यानी विजयी झाल्याबद्दल सांगोला तालुक्यातील शाळांमध्ये लोकसहभागातून ७ हजार ७oo वहयांचे वाटप करणार.               – अॅड.गजानन भाकरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button