वाढेगाव येथे तालुकास्तरीय जागतिक मृदा दिन कार्यशाळा संपन्न
सांगोला :
जागतिक मृदा दिनानिमीत्त कृषी विभागामार्फत सांगोला तालुक्यातील वाढेगांव येथे मोहोळ येथील शास्त्रज्ञ डॉ.तानाजी वळकुंडे व तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेमध्ये माती नमुना का तपासावा ? त्याचे कोणकोणते फायदे आहेत ? तसेच कृषी विभागाच्या योजनेविषयी,प्रमुख मार्गदर्शक म्हणून आलेले कृषी विज्ञान केंद्र,मोहोळ येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.तानाजी वळकुंडे यांनी व तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी युवक नेते संजय डोईफोडे, उपसरपंच शिवाजी दिघे,माजी सरपंच दादासो ज्ञानदेव दिघे, सोसायटीचे माजी चेअरमन धोंडीरामदादा दिघे,नारायण दिघे,दीपक भगत,आप्पा इंगवले,विष्णू दिघे,सुरेशभाऊ दिघे, बंडू चौगुले,गोरख सूर्यगंध,पप्पू माने,भास्कर दिघे तसेच सांगोला कृषी कार्यालय येथील कृषी पर्यवेक्षक चव्हाण,कृषी पर्यवेक्षक श्रीकांत शिंदे,’आत्मा’चे श्री.पोळ,श्री. सोनवणे,कृषी सहाय्यक मनोज जाधव इ.उपस्थित होते.
यावेळी,माती नमुना पत्रिकाही वाटप करण्यात आली.कार्यक्रमाचे शेवटी,सांगोला मंडल कृषी अधिकारी श्री.झांबरे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर भाऊसाहेब फुंडकर एमआरईजीएस फळबाग लागवड प्लॉटची पाहणीही करण्यात आली.
——————————————————————————