सामाजिक

धायटी येथे आरपीआय शाखेचे उदघाटन संपन्न

 

सांगोला :

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक,अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला तालुक्यातील धायटी येथे सांगोला तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांच्या हस्ते रिपाईं शाखेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी,धायटी गावचे सरपंच रविराज मेटकरी,प्रकाश देवकाते,तंटामुक्ती अध्यक्ष समाधान भोसले तसेच सांगोला तालुका आरपीआय (आठवले गट) कार्यकारिणी सदस्य विक्रम शेळके,रवी बनसोडे,सतीश काटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

                   याप्रसंगी,आरपीआयच्या धायटी शाखेच्या कार्यकारिणी सदस्यांचीही निवड करण्यात आली.  धायटी शाखेचे अध्यक्ष म्हणून बजरंग गायकवाड यांची तर,उपाध्यक्ष म्हणून समाधान किर्तके व बापू आठवले यांची निवड करण्यात आली.तसेच कोषाध्यक्ष म्हणून नितीन गायकवाड व विजय किर्तके यांची तर,सचिव म्हणून सौदागर किर्तके आणि कार्याध्यक्ष म्हणून संतोष गायकवाड व खंडू किर्तके यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर,धायटी शाखेचे मार्गदर्शक म्हणून दगडू गायकवाड,मधुकर गायकवाड,लक्ष्मण गायकवाड,नानासो झेंडे व अभिमान किर्तके यांची निवड करण्यात आली.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button