शैक्षणिक

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पालक मेळावा संपन्न

सांगोला :

सांगोला येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित,शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील द्वितीय सत्रातील पालक मेळावा नुकताच संपन्न झाला.

या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ए.आर.गायकवाड होते.प्रारंभी पालक प्रतिनिधी शरद मिसाळ व महिला पालक प्रतिनिधी स्वाती कदम यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित पालक व पालक प्रतिनिधी यांचे स्वागत सचिव ए.आर. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव ए.आर.गायकवाड व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम,सराव परीक्षा,रात्र अभ्यासिका,दत्तक-पालक योजनेचे कार्य याविषयी प्राचार्य डॉ.आर.ए. देशमुख यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली.

पालक प्रतिनिधी शरद मिसाळ यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की,कॉलेजमधील असणारी आदरयुक्त शिस्त,उत्कृष्ट निकालाची परंपरा, देश विदेशातील विवीध नामवंत कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची नोकरीसाठी होणारी निवड या गोष्टींचे कौतुक करुन दर्जेदार शैक्षणिक सुविधा,शिक्षणाचा उत्तम दर्जा तसेच विद्यार्थ्यांवर होणारे चांगले संस्कार ही शिवाजी पॉलिटेक्निकची खरी ओळख असल्याचे मत व्यक्त केले.

महिला पालक प्रतिनिधी स्वाती कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की,आपला पाल्य या संस्थेत संस्कारीत व गुणवत्ताधारक बनत असून या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकत असताना उत्तम संस्काराची शिदोरी,कठोर मेहनत,शिस्त व प्रयत्नवादी बनून भविष्यासाठी उत्तम नागरिक म्हणून तयार होतात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था व कॉलेज कटिबद्ध असून येणाऱ्या काळात देखील या संस्थेतील विद्यार्थी उज्वल यश संपादन करुन उत्तम करिअर करतील,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या पालक मेळाव्यानंतर उपस्थित पालकांनी आपल्या पाल्याच्या दत्तक-पालक शिक्षकांची भेट घेऊन त्यांची प्रगती जाणून घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य,सर्व विभाग प्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी.बावचे व आभार प्रदर्शन प्रा.व्ही.बी.पैलवान यांनी केले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button