सांगोला :
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या गांवभेट व जनसंवाद दौऱ्याला दिवसेंदिवस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून सांगोला तालुक्यातील वाकी-घेरडी येथे तर,मुसळधार पाऊस कोसळत असतानाही हजारो नागरिकांनी दीपकआबांच्या गांवभेट दौऱ्यास उपस्थिती दर्शवत दीपकआबांचे जंगी स्वागत केले.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत-गाजत व फुलांची उधळण करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि अनेक महिलांनी औक्षण करुन आपल्या लाडक्या नेत्याचे,दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे वाकी-घेरडी गांवात जंगी स्वागत केले.यावेळी वाकी-घेरडी गावातील सरपंच अर्चना शिंदे,विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शिंदे,गणेश कांबळे, रफिक शेख,डॉ.पुण्यवंत निमग्रे,तुकाराम घेरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
रविवारी दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत दीपकआबा हे वाकी-घेरडी गांवच्या गांवभेट व जनसंवाद दौऱ्यावर होते.यासमयी,वाकी गावातील मारुती मंदिर, बुध्दविहार,शिंदेवस्ती,खांडेकरवस्ती,माळी-दाईगडे वस्ती,निमग्रेवाडी,दिवसे-पवार वस्ती या परिसरातील शेकडो नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाकी-घेरडी परिसरातील नागरिकांच्या रस्ते, पाणी,वीज व आरोग्य याविषयी अडचणी जाणून घेतल्या आणि तिथे जागेवरच संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करुन वाकी-घेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.वाकी- घेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जागेवरच निपटारा केल्याने या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
————————————————————————
साळुंखे-पाटील परिवाराचे वाकी-घेरडी गांवावर विशेष लक्ष :
सांगोला तालुक्यातील विकासाचे रोल मॉडेल म्हणून वाकी-घेरडी हे गांव ओळखले जाते.छोटे गाव असूनही परंपरेने साळुंखे-पाटील परिवाराने या गांवावर विशेष लक्ष दिले आहे.स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्यानंतर स्व.शारदादेवी साळुंखे-पाटील व जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जयमालाताई गायकवाड यांनीही आमच्या गांवावर विकास निधीचा पाऊस पाडला आणि दीपकआबांनी तर, आमच्या वाकी-घेरडी गावाला नेहमीच प्राधान्य देऊन आमचे प्रश्न मार्गी लावले आहेत.साळुंखे-पाटील परिवाराचे उपकार आम्ही वाकी-घेरडी गांवचे ग्रामस्थ कदापिही विसरणार नाही.
– गणेश कांबळे (वाकी-घेरडी)
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने