महत्वाच्या बातम्या

पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्या,संधीचे सोने करुन तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही – आमदार शहाजीबापू पाटील

चोपडी (सांगोला) :

मागील पाच वर्षाच्या काळात आमदार झाल्यापासून तालुक्यातील शेती सिंचनाच्या विविध योजना,रस्ते, पाणी,वीज,समाजमंदिरे,मंदिरे व सभामंडपासह इतर अनेक कामांच्या निधीसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करुन नियोजनबध्द कामे पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ वर्षाच्या काळात सुमारे ५ हजार कोटी रुपये विकास निधी आणला असून सांगोला तालुक्याचा परिपूर्ण विकास करणे हेच माझे ध्येय आहे.सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करणे, तरुणांच्या हाताला रोजगार,शेती सिंचनाच्या व पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करणे,यासाठी सांगोला तालुक्यासह चोपडी गावातील ग्रामस्थांनी आशीर्वाद देवून आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा आमदारकीची संधी दिल्यास संधीचे सोने करुन तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही,अशी ग्वाही आम.शहाजीबापू पाटील यांनी चोपडीकरांपुढे दिली.

               आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून सांगोला तालुक्यातील चोपडी येथील श्री. सिध्दनाथ मंदिराशेजारी सभामंडप बांधकामासाठी १० लाख रुपये निधी दिला होता.तसेच येदुचामळा येथील गणेश मंदिरासमोर सभामंडपासाठी १० लाख रुपये निधी व श्री हनुमान गणेश तरुण मंडळाचे १० लाख,या निधीतून ४० बाय ४० आकाराचा भव्य सभामंडप उभारण्यात आला असून या दोन्ही सभामंडपाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सोमवारी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी संपन्न झाला.या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी,चोपडी गावात सुरु असलेल्या शिवस्मारकासाठीही २ लाख ५१ हजार रुपये व येदूचामळा येथे गणेशमंदिर सुशोभीकरण आणि पेव्हिंग ब्लॉकसाठी १० लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले. सांगोला तालुक्यातील नागरिकांना सुखी व समाधानी ठेवणे हे आपले उद्दिष्ट आहे. नागरिकांनी कामे सांगावीत, कामे करण्यास मी थकणार नाही. आजपर्यंत अनेक विकासकामे मार्गी लावली असून उर्वरित विकास कामे करण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद महत्त्वाचे ठरणार आहेत,असे आम.शहाजीबापू यावेळी म्हणाले.

यावेळी आर.एस.बाबर यांनी प्रास्ताविकात चोपडी गावासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलेला निधी व केलेली विकास कामे याचे कौतुक करत भविष्यात बापूंच्या पाठीशी चोपडी गाव उभे राहील,असे आश्वासन दिले. आमदार शहाजीबापू यांनी चोपडी गावातील रस्ते, मंदिराची कामे व बुध्देहाळ तलावाचा टेंभू योजनेत समावेश करुन वर्षातून ४ वेळा तलावात पाणी सोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन बुध्देहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न कायमचा सोडवला आहे. तसेच तालुक्यातील नद्यांनाही कालव्याचा दर्जा देण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम.शहाजीबापूंनी मागणी केलेली ही कामे मार्गी लावली व दुष्काळी तालुका हा सांगोल्याचा कलंक पुसण्याचे मोठे काम केले आहे,असे इतर वक्त्यांनी यावेळी सांगीतले.


येदूचामळा येथील गणेश मंदिरासाठी स्वर्गीय टी.जी.बाबर सर यांनी ४ गुंठे जागा बक्षीसपत्र करुन दिली. त्याबद्दल श्री हनुमान गणेश तरुण मंडळ,येदुचा मळा यांच्या  वतीने आभार मानण्यात आले व लवकरच त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यासमयी,श्री सिद्धनाथ मंदिर समितीच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा आर.बी.बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व श्री हनुमान गणेश तरुण मंडळाच्या वतीनेही आमदार शहाजीबापू पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री हनुमान गणेश तरुण मंडळ,येदुचामळा मंडळाचे मार्गदर्शक चेअरमन दगडू गोविंद बाबर,अध्यक्ष दगडू वसंत बाबर,ग्रा.पं.सदस्य अनिल आप्पासो जगदाळे,खजिनदार श्रीकांत दादासो बुरुंगे,  पत्रकार रविराज शेटे यांचा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी,आमदार शहाजीबापू पाटील यांनी चोपडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राजाबाई सदाशिव बाबर यांच्या निवासस्थानी भेट दिली.या कार्यक्रमासाठी राघुशेठ बाबर,आर.एस.बाबर, अभियंता एल.बी.केंगार,श्रीमंत सरगर,चेअरमन भिकाजी बाबर,सचिन खळगे,ग्रा.पं.सदस्य अनिल जगदाळे,ग्रा.पं.सदस्य दिनेश बाबर,रामचंद्र बाबर,सुरेश बाबर,सतीश पाटील,पोपट बाबर, आप्पासाहेब बाबर, लालासो जगदाळे,मारुती वराडे,विकास जगदाळे,  भारत बाबर,अमोल बाबर,खंडू वराडे,चंद्रशेखर बाबर यांच्यासह युवावर्ग,ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बाबर यांनी केले.तर,चेअरमन दगडू बाबर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
—————————————————————— 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button