राजकीय

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी सीमा इंगवले तर,जिल्हा उपाध्यक्षपदी राणी चव्हाण

 

सांगोला :

                                 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या महिला आघाडीच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी सीमा इंगवले यांची तर,जिल्हा उपाध्यक्षपदी राणी चव्हाण यांची निवड जिल्हाध्यक्षा मुबीना मुलाणी यांनी जाहीर केली.

            ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या तालुका पातळीवरील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या
निवडीबाबत विचार विनिमय करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्षा मुबीनाताई मुलाणी यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नुकतीच बैठक आयोजित केली होती.सदर बैठकीत मुबीनाताई मुलाणी यांनी पदाधिकाऱ्यांची गरज,त्यांचे अधिकार व मर्यादा याबाबत विश्लेषण करुन याप्रसंगी, सांगोला तालुकाध्यक्षपदी सीमा इंगवले यांची तर,जिल्हा उपाध्यक्षपदी राणी चव्हाण यांची निवड जाहीर केली.

                जिल्हाध्यक्षा मुबीनाताई मुलाणी यांनी नुतन पदाधिकार्‍यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी,माजी नगराध्यक्ष रफीकभाई नदाफ, महिला पदाधिकारी व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.निवड झाल्याबद्दल नुतन महिला पदाधिकार्‍यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button