महत्वाच्या बातम्या

सांगोल्याच्या संकेत भोसलेची विविध ४ पदासाठी निवड

 

सांगोला :

                             सांगोला येथील प्रतिथयश सिव्हिल इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टर संतोष भोसले यांचे चिरंजीव संकेत भोसले याची सरळसेवा भरतीमधून ४ पदावर निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्व सेवा भरती परीक्षेत संकेत संतोष भोसले याने घवघवीत यश संपादन केले असून त्याची नगरपरिषद ज्यु.इंजिनिअर, जि.प.मध्ये सीईए,जलसंपदा विभागात (डब्ल्युआरडी) मध्ये सीईए आणि सिटी सर्व्हेमध्ये सर्व्हेअर अशा ४ पदावर निवड झाली आहे.

संकेत भोसलेचे प्राथमिक शिक्षण सांगोला येथील उत्कर्ष विद्यालय येथे,माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिरमध्ये, ११ वी व १२ वी सोलापूर येथील ए.डी.जोशी कॉलेजमध्ये तर,इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षण वालचंद कॉलेज, सांगली येथे झाले आहे.  संकेतची ४ पदावर निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button