सांगोला विधानसभा मतदारसंघातील गावांतर्गत मुलभूत नागरी सुविधांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला :
सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजूर करुन आणण्यात यश मिळवले असून आमदार शहाजीबापू यांनी सांगोला विधानसभा मतदार संघातील गावांतर्गत मुलभूत नागरी सुविधांसाठी सुचवलेल्या ४३ विकासकामांना ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
गेल्या पाच वर्षांत आमदार शहाजीबापू पाटील यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणत मतदार संघाचा चेहरामोहरा बदलला असून मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु आहे.महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी लेखाशीर्ष २५१५ मधून सांगोला विधानसभा मतदार संघांतर्गत विविध गावातील नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुचविलेल्या ४३ कामांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.हा निधी मंजूर झाल्यामुळे मतदार संघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
————————————————————
खालील ४३ विकास कामांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर :
= जवळा (ता.सांगोला) येथील जमीन गट नं. ६४५/१ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे,परिसर बांधकाम व सुशोभिकरण करणे – १ कोटी ५० लाख रुपये.
= चिकमहुद येथील महारनवर वस्ती सोमनाथ मंदीर येथे सभामंडप बांधणे – १० लाख रुपये.
= चिकमहूद येथील बंडगरवाडी नं.१ ते सुळ वस्ती रस्ता करणे – १८ लाख रुपये. = चिकमहूद येथील पंढरपूर – दिघंची रोड ते संजय पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता करणे – १० लाख रु. = महूद येथील गोडसे लवण येथे धर्मा गोडसे वस्ती बाळूमामा मंदीरासमोर सभामंडप- १० लाख रु. = महूद येथील नवी पेठ येथे दत्त मंदीरासमोर सभामंडप बांधणे – १० लाख रु. = महूद येथील पवारवाडी अंबिका मंदीर ते जोतीराम पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे – १० लाख रु. = चिणके येथील कॅनॉल फाटा ते यादव फार्म हाऊसपर्यंत रस्ता करणे – १० लाख रु. = नरळेवाडी (वाकी) येथील पांडूरंग गळवे वस्ती डांबरी रस्त्यापासून ढेंबरे वस्ती मार्गे नरळेवाडी पर्यंत रस्ता करणे – २० लाख रु. = वझरे येथील धुरे वस्ती कोटी मळा रस्ता करणे – १० लाख रु = अकोला येथील एनआरबीसी कॅनॉल किमी ६२/४८० ते किमी ६३ रस्ता करणे – १० लाख रु.
= अकोला येथील लोणविरे रस्ता ते जगन्नाथ शिंदे घरापर्यंत रस्ता करणे – १५ लाख रु. = धायटी येथील जगदाळे मळा बिरोबा मंदीरासमोर सभामंडप बांधणे – १० लाख रु. = वाणीचिंचाळे येथील जोतिबा मंदीरासमोर सभामंडप बांधणे – १० लाख रु. = नाझरे येथील चोपडी – नाझरा रस्ता ते विजय वराडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे – १० लाख रु. = कडलास येथील दत्त मंदीर कडलास (माने महांकाळवाडी) येथे सभामंडप बांधणे – १० लाख रु. = बलवडी (ता.सांगोला) येथील गट नं.१२३/१२४ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे – ३० लाख रु. = आलेगाव येथील अप्रुका नदी पुल ते विजय फुलारे शेत ते राजेंद्र पाटील वस्ती रस्ता करणे – १० लाख रु. = लोटेवाडी येथील मायाक्का मंदीर येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लाख रु. = देवळे येथील सावे ते देवळे रस्त्यापासून सुरेश खांडेकर वस्ती रस्ता करणे – ५ लाख रु. = तिप्पेहळ्ळी येथील राष्ट्रीय महामार्ग ते माऊली मंदीरापर्यंत सिडी वर्कसह रस्ता करणे – ५ लाख रु. = देवळे येथील ग्रामा ३३८ अनपट वस्ती ते अमोल खांडेकर वस्ती रस्ता करणे – ५ लाख रु. = कडलास येथील निजामपूर-कडलास डांबरीपासून नानासाहेब गायकवाड वस्ती पर्यंत रस्ता करणे – १० लाख रु. = कारंडेवाडी (उदनवाडी) येथील श्री. प्रभुलिंग मंदीरासमोर पेव्हींग ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे – ५ लाख रु. = हातीद येथील खंडोबा मंदीर (रामोशी वस्ती) गावठाण समोर सभामंडप बांधणे – १० लाख रु. = वाढेगाव येथील मंडले वस्ती येथे पत्राशेड मारणे – ५ लाख रु. = वासूद येथील ज्ञानेश्वर मंदीर, केदारमळा येथे सभामंडप बांधणे – १० लाख रु. = य.मंगेवाडी येथील अजनाळे रोड पाण्याची टाकी ते पाटील वस्ती पर्यंत रस्ता करणे – १० लाख रु. = जुनोनी,काळुबाळूवाडी येथील मायाक्का मंदीरासमोर सभामंडप बांधणे – १० लाख रु. = बागलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून गणेश चळेकर वस्ती पर्यंत रस्ता करणे – १० लाख रु. = भाळवणी येथील शिंदे माळी वस्ती येथे सभामंडप बांधणे – १० लाख रु. = सोनलवाडी येथील धुळदेव मंदीरासमोर पेव्हींग ब्लॉक बसविणे १० लाख रु. = कटफळ येथील लांडा महादेव रस्त्यापासून जनार्दन मेनकुदळे वस्ती पर्यंत रस्ता करणे – १० लाख रु. = बामणी येथील सागर पाटील नवीन घर ते रामहरी भोसले घरापर्यंत गटार बांधणे – १० लाख रु. चिंचोली येथील जोतिबा मंदीरासमोर सभामंडप बांधणे – १० लाख रु. = बामणी येथील रेल्वे लाईन ते शिंदे जगताप वस्ती (चिंचोली शिव) पर्यंत रस्ता करणे – १० लाख रु. = भोपसेवाडी येथील माळी वस्ती ते गावडे वस्ती रस्ता करणे – ५ लाख रु. = भोपसेवाडी येथील कोरे वस्ती ते कोळेकर वस्ती रस्ता करणे – ५ लाख रु. = मांजरी येथील देवकतेवाडी मारुती मंदीर ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता करणे – ३० लाख रु. = मांजरी येथील चांगदेव फाटे वस्ती ते नामदेव शिनगारे वस्ती रस्ता करणे – ७ लाख रु. = कमलापूर येथील तंडे मळा रोड ते सदाशिव तंडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे – ५ लाख रु. = पळशी (ता.पंढरपूर) येथील जि.प.प्रा.शाळा डोण मळा, सोनके-पळशी रोड पर्यंत रस्ता करणे – २० लाख रु. = भोपसेवाडी (ता.सांगोला) येथील मायाक्का मंदीरासमोर सभामंडप बांधणे – १० लाख रु.
वरीलप्रमाणे सांगोला विधानसभा मतदार संघातील विवीध ४३ विकास कामांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
——————————————————————————