सांगोला :
सांगोला येथील चौंडेश्वरी अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ही संस्थेचे चेअरमन इंजि.मधुकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विठ्ठल मंदिर,कोष्टी गल्ली येथे उत्साही वातावरणात नुकतीच पार पडली.
प्रारंभी,पतसंस्थेचे संस्थापक,चेअरमन डॉ.अनिल कांबळे यांचे शुभहस्ते श्री.चौंडेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन सभेला सुरुवात झाली.सुरुवातीला व्हा.चेअरमन संजय लाटणे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.तर,पतसंस्थेचे चेअरमन इंजि.मधुकर कांबळे यांनी आपल्या प्रस्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
सदर संस्थेचे मार्च २०२४ अखेर ६०७ सभासद असून संस्थेला मार्च २०२४ अखेर रु.१ लाख ११ हजार निव्वळ नफा झाला असून यावर्षी संस्थेतर्फे जे सभासद त्यांचा शेअर्स पूर्ण करतील,त्यांना दिवाळी भेट म्हणून ५ किलो साखर,मोती साबण व उटणे देणार असल्याची माहिती चेअरमन इंजि.मधुकर कांबळे यांनी दिली.
यावेळी,विषय पत्रिकेवरील सर्व विषय संस्था सचिव सौ.शितल डोईफोडे यांनी वाचून दाखवले व त्याला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. याप्रसंगी संस्थेचे कर्जदार सभासद सुशांत दिवटे, प्रमोद टेके व शफिक शेख यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संचालक राजकुमार दौडे,अवधूत कुमठेकर,संजय कांबळे,विजय चोथे,कुलदीप बाबर,संजय लाटणे,अनिल लाटणे सर,शिवदास खडतरे,भास्कर सपाटे,खटावकर साहेब व इतर सभासद उपस्थित होते.शेवटी सर्वांचे आभार संचालक अवधूत कुमठेकर यांनी मानले.
——————————————————————————
More Stories
गावागावात,क्लस्टर स्तरावर शेतमाल खरेदी केंद्रांचे जाळे विस्तारुन ‘प्राईस डेफिशियन्सी पेमेंट’सारखी प्रणाली लागू करावी – खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर