नाझरे/प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यातील नाझरे परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे नाझरे,वझरे,बलवडी,सरगर वाडी,अनकढाळ आदी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
वादळी वारे व पावसामुळे सरगर वाडी येथील सिकंदर मौलाना नदाफ यांच्या म्हशीचा मृत्यू झाला तर, विजयकुमार जावीर यांच्या जनावरांच्या गोठ्याची पत्रे उडून गेली व घरासह,डाळिंब पिकात पाणी साचल्याने नुकसान झाले.तसेच नाझरे येथील वसंत व रामचंद्र अडसूळ यांच्या घरावर व वाहनावर झाड पडून नुकसान झाले तर,वझरे येथील बिरा वाकडे यांच्या डाळिंब बागेमध्ये तळे साचले.त्याचबरोबर,अनकढाळ, सरगर वाडी,नाझरे,वझरे,बलवडी येथील डाळिंब,मका, बाजरी,तूर,पेरु इत्यादी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील यांनी नाझरे परिसरातील नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली आणि नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी केली आहे. यावेळी या भागातील तलाठी,सर्कल,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक, ग्रामस्थ व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने