सांगोला :
संपूर्ण सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण व समग्र विकासाची बांधिलकी मी स्वीकारली असून सांगोला शहरातील विवीध १२ विकास कामांसाठी सुमारे १० कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले सांगोला शहरातील सर्व प्रश्न आमदार शहाजीबापू पाटील व मी दोघे मिळून मार्गी लावू,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान,अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही विकास कामे मार्गी लागणार असल्याने आबा-बापूंच्या नेतृत्वाखाली सांगोला शहराचा कायापालट होऊ लागला असून आबा-बापूंच्या नेतृत्वाखाली सांगोला शहराचा चेहरा मोहराच बदलतोय,असे दिसून येते.
सांगोला शहरात नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या लक्षात घेऊन माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी शहरातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याची मागणी राज्याच्या नगर विकास विभागाकडे केली होती.यामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगर परिषदेचे खुले सभागृह बांधणे कामासाठी २ कोटी रुपये,होलार समाजासाठी नगरपरिषद क्षेत्रात समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे या कामासाठी १ कोटी रुपये,मिरज रोड येथील नाभिक समाज मंदिर येथे पहिला मजला बांधण्याच्या कामासाठी ५० लाख रुपये,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लादीकरण करणे कामासाठी २५ लाख रुपये,बुरुड समाजासाठी समाज मंदिर बांधणे कामासाठी ५० लाख रुपये,नगरपरिषद हद्दीतील चांडोलेवाडी,शेंबडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते विकसित करणे या कामासाठी १ कोटी ५० लाख रुपये,मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता खडीकरण व ओढ्यावर सीडी वर्क करणे या कामासाठी १ कोटी ७५ लाख रुपये,नगरपरिषद हद्दीतील पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आप्पासाहेब देशमुख घर ते नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्ता करणे या कामासाठी १ कोटी रुपये, जुना सावे रोड पैलवान मंगल कार्यालय,तानाजी बिले घर ते माण नदीपर्यंत रस्ता करणे या कामासाठी ५० लाख रुपये,वाढेगाव रोड ते भाऊसाहेब पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे या कामासाठी ५० लाख रुपये, चिंचोली रोड इन्नुस मुलाणी वस्ती येथे रस्ता करणे या कामासाठी २५ लाख रुपये,एखतपूर रोड आरक्षण क्रमांक ६३ अ येथील भाजी मंडई येथे लादीकरण या कामासाठी २५ लाख रुपये,अशा एकूण १२ विकास कामांसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सांगोला नगरपरिषद हद्दीत मंजूर असणारी ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील,अशी खात्रीही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने