महूद खून प्रकरणातील पीडित कुटुंबियांना दीपकआबांनी केली लाख रुपयांची मदत

 

सांगोला :

सांगोला तालुक्यातील महूद बु॥ येथील मातंग समाजातील युवक स्व.सुनील कांबळे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत महूद गांवभेट दौर्‍यादरम्यान दीपकआबांनी आवर्जून मयत सुनील कांबळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना रोख १ लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याने मातंग समाज बांधवांसह पिडीत कुटूंबियांनी दीपकआबांचे आभार मानले आहे.

कार्यतपस्वी स्व.आम.काकासाहेब साळुंखे-पाटील व स्व.ह.भ.प.शारदादेवी साळुंखे-पाटील यांचा समाजकारणाचा वारसा लाभलेले माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे नेहमीच समाजातील सर्व घटकांच्या सुखदुःखात सहभागी असतात.उभ्या आयुष्यात जात,धर्म, पक्ष,पार्टी न पाहता गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे एकमेव नेते म्हणून आबांची ख्याती सर्वश्रुत आहे.

त्याचेच एक उदाहरण म्हणजे,११ जुलै रोजी महूद बु॥ येथील मातंग समाजातील युवक सुनील कांबळे यांची समाज मंदिरासमोर निर्घृण हत्या केली गेली होती.सदर घटनेचे पडसाद राज्यभर मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून उमटले होते.या घटनेची तात्काळ दखल घेऊन दीपकआबांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वनही केले होते.परंतु या कुटुंबाची अत्यंत गरीब परिस्थिती,उघड्यावर पडलेला संसार व दोन लहान मुले पाहून दीपकआबांनी कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले.

        प्रशासनाकडून पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेलच मात्र,पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत महूद गांवभेट दौरा करित असताना दीपकआबांनी आवर्जून मयत स्व.सुनील कांबळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना रोख १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली व या कुटुंबाच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्दही दिला. त्यांच्या शब्दपूर्तीमुळे कांबळे कुटुंब तसेच समस्त मातंग समाज बांधवानी दीपकआबांच्या संवेदनशील कृतीबद्दल आभार मानले.दीपकआबांनी दाखवलेली माणुसकी व संवेदनशीलता मातंग समाज विसरणार नाही,असे विनोद रणदिवे यांनी सांगीतले.
          ———————————————————————

दीपकआबांनी दिलेली मदत मातंग समाज कधीच विसणार नाही :

                           दीपकआबा यांनी स्व.सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांना दिलेली मदत ही दीपकआबा यांच्यातील प्रेमळ व संवेदनशील माणूस दर्शवणारी कृती आहे.दीपकआबांनी दिलेलं योगदान व मदत तालुक्यातील मातंग समाज कधीच विसणार नाही.
                                              – ॲड.अभिषेक कांबळे
——————————————————————————