सांगोला :
सांगोला नगरपरिषद हद्दीतील नवीन बांधकाम केलेल्या मालमत्तांची नोंद नसल्याने नगरपरिषदेला कर उत्पन्नाला मुकावे लागत आहे.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम,१९६५ चे कलम १२४ प्रमाणे सांगोला नगरपरिषदेच्या वतीने नोंद नसलेल्या मालमत्तांची कर आकारणी करण्यासाठी पुरवणी कर आकारणीचे कामकाज सुरु करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.
सांगोला नगरपरिषद हद्दीतील नवीन बांधकाम केलेल्या मालमत्तांची नोंद घेवून कर आकारणी करण्यासाठी पुरवणी कर आकारणीचे कामकाज सुरु करण्यात आले असून सदर कामकाज पूर्ण करण्याकरीता एकूण ३ पथके तयार करण्यात आली आहेत. पथकातील न.पा.कर्मचारी मालमत्तांचे मोजमाप घेतील त्यानुसार पुढे कर आकारणी करण्यात येईल.
——————————————————
आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत अन्यथा,अनधिकृत बांधकामाची नोंद :
पुरवणी कर आकारणीकामी मालमत्तांचे मोजमाप घेण्यासाठी आलेल्या नगरपरिषदेकडील कर्मचारी पथकांना सहकार्य करावे,तसेच मालकी हक्क दर्शविणारी कागदपत्रे (७/१२ किंवा सिटी सर्व्हे उतारा), लाईट बिल झेरॉक्स, बांधकाम परवाना,वापर परवाना इ.आवश्यक ती कागदपत्रे सदर पथकाकडे जमा करावीत अन्यथा,महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम,१९६५ चे कलम १५० क अन्वये पूर्वलक्षी प्रभावाने तसेच कलम १८९ अ अन्वये अनाधिकृत बांधकाम म्हणून सदर मालमत्तेची नोंद घेण्यात येईल. – डॉ.सुधीर गवळी (मुख्याधिकारी तथा प्रशासक)
———————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने