सांगोला :
वादळी वारे व अवकाळी पावसामुळे सांगोला तालुक्यातील शेती पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला असून वीज पडल्याने अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे,महसूल प्रशासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी,अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या आहेत.
सांगोला तालुक्यात गेल्या आठवड्यापासून वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेती पिके,फळबागा व भाजीपाला यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.तर,वीज पडल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे.अशा परिस्थितीत गोरगरीब शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन,त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करुन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच महावितरण कार्यालयाने खंडीत वीजपुरवठा तात्काळ सुरु करण्याचे दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत,असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकारी वर्गाला सांगीतले आहे.
वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांना तसेच अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे केळी,डाळिंब, आंबा आदी फळबागांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या घरांची पडझड आणि लाईटच्या खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यातच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महावितरण कार्यालयानेही तात्काळ विजेचे खांब पूर्ववत उभे करुन वीज पुरवठा सुरळीत करावा,अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी बोलताना दिले.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने