सामाजिक

सांगोला येथील प्रा.राजेंद्र ठोंबरे व मनिषा ठोंबरे यांना पुरस्कार प्रदान

 

सांगोला :

सांगोला शहरातील ठोंबरे दाम्पत्याला दोन वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सेवानिृत्त अध्यापक राजेंद्र ठोंबरे यांना “नॅशनल एक्सलंस अवार्ड” देवून गौरविण्यात आले.तर, त्यांच्या सुविद्य पत्नी मनिषा ठोंबरे यांना “काव्य जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.

अहमदाबाद (गुजरात) येथील पलपब या संस्थेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड येथे संपन्न झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सचिव डॉ.ज्ञानेश्वर मुळे हे होते. याप्रसंगी,व्यासपीठावर संयोजिका लीना पाटील,सहाय्यक पोलिस अधिकारी डाॅ.विनायक जाधव,प्रसिध्द लेखिका रेखा दिक्षीत, स्वाती कुरळे व प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द कवी हणमंत चांदगुडे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना नॅशनल एक्सलंस अवार्ड,जीवन गौरव पुरस्कार व साहित्य गौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.यामध्ये सांगोला शहरातील सेवानिृत्त अध्यापक राजेंद्र ठोंबरे हे सांगोल्यातील मुक्त पत्रकार,ज्येष्ठ नागरिकांच्या गेट-टुगेदरचे मुख्य प्रवर्तक, चैतन्य हास्य क्लबचे सदस्य असून ते ज्येष्ठ नागरिकांचे स्नेह मेळावे,त्यांचे वाढदिवस,विवाह वर्धापन दिन, अंगत-पंगत,वन भोजन,गुरु पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आदि कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणण्याचे व त्यांच्या जीवनात आनंद व चैतन्य निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. हल्लीच्या काळात दोन भाऊ एकत्र येणे कठीण असताना दरवर्षी अनेक वेगवेगळ्या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सातत्याने एकत्र आणण्याचे कार्य करत असल्याबद्द्ल त्यांना “नॅशनल एक्सलंस अवार्ड” देवून गौरविण्यात आले.तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी मनिषा ठोंबरे यांना काव्य लेखनातील योगदानाबद्द्ल “काव्य जीवन गौरव पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात ६ लेखक व कवींच्या वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.नंतर नव कवींना त्यांच्या कविता सादर करण्याची संधी देण्यात आली.  या कार्यक्रमास साहित्यिक,लेखक,कवी,पुरस्कार विजेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button