सामाजिक

डॉ.संजीवनीताई केळकर यांना “डाॅ.चाटी जीवन गौरव पुरस्कार” प्रदान

 

सांगोला :

सांगोला शहरातील प्रतिथयश डाॅक्टर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व माता-बालक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.संजीवनीताई केळकर यांना सोलापूर येथील ब्राम्हण समाज सेवा संघाचा “डॉ.त्रिंबक लक्ष्मण चाटी स्मृती जीवन गौरव पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला.

                 सांगोला येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.संजीवनीताई केळकर यांनी वैद्यकीय,शैक्षणिक, सामाजिक व महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना हा “डॉ.त्रिंबक लक्ष्मण चाटी स्मृती जीवन गौरव पुरस्कार” देण्यात आला असून सोलापूर येथील हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात आयोजित एका खास समारंभात ज्येष्ठ विधिज्ञ विजय मराठे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.          डॉ.संजीवनीताई केळकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
———————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button