महत्वाच्या बातम्या

सांगोल्याच्या सुर्योदय अर्बन पतसंस्थेला दीड कोटीच्या वर नफा

सांगोला :

अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या सांगोला तालुक्यातील सुर्योदय अर्बन पतसंस्थेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात मोठी गगनभरारी घेतली असून संस्थेस यावर्षी १ कोटी ६० लाख ९१ हजार १८६ रुपये नफा मिळाला असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

सुर्यादय अर्बन पतसंस्थेची ही वाटचाल जगन्नाथ भगत गुरुजी,सुभाष दिघे गुरुजी व डॉ.बंडोपंत लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरु असून पतसंस्थेचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांचा गुणवत्तापूर्ण कार्यावर नेहमीच भर राहिलेला आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या अनेक संस्थांचा विस्तार मोठ्या वेगाने होत असला तरी गुणवत्तेला बाधा पोहचणार नाही,याचीही दक्षता त्यांनी वेळोवेळी घेतलेली आहे.त्यांच्याकडून अहोरात्र घेतल्या जाणार्‍या परिश्रमामुळे त्यांनी सुरु केलेल्या सर्व संस्था या भक्कमपणे उभ्या आहेत.

सुर्यादय अर्बन पतसंस्थेने कमी कालावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून संस्थेची वार्षिक उलाढाल ही जवळजवळ १०७ कोटी आहे.या संस्थेचे ३ हजार ५०० सभासद असून संस्थेचे शेअर्स भागभांडवल हे २ कोटी ८ लाख ३९ हजार ३२० रुपये इतके आहे. संस्थेकडे ६० कोटी रुपयांच्या ठेवी जमा असून संस्थेने आजपर्यंत ५० कोटींचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती सुर्यादय अर्बन पतसंस्थेच्या चेअरमन पूजा इंगवले यांनी दिली.

संस्थेने सभासद,ठेवीदार,कर्जदार,कर्मचारी,अधिकारी, मित्रपरिवार व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळविले असून स्थापनेपासून पतसंस्थेस ‘अ’ वर्ग मिळाला आहे. स्थापनेपासून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात येत असून संस्थेचा स्वनिधी १ कोटी ८५ लाख ९८ हजार ८०३ इतका असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक आण्णासो इंगवले यांनी दिली.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button