सामाजिक

बामणीत ‘माणदेशी ग्रंथालय पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न

सांगोला :

कै.दमयंती डिकसळकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सांगोला तालुक्यातील बामणी येथे “राज्यस्तरीय माणदेशी ग्रंथालय पुरस्कार” हा पुरस्कार वितरण सोहळा विवीध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सांगोला तालुक्यातील बामणी येथील कै.दमयंती डिकसळकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मेडशिंगी (ता.सांगोला) येथील अंबिकादेवी वाचनालय या संस्थेस सांगोला सूतगिरणीचे माजी चेअरमन प्रा.नानासाहेब लिगाडे यांच्या हस्ते तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.अंबिकादेवी वाचनालयाचे अध्यक्ष डाॅ.मच्छिंद्र सोनलकर व ग्रंथपाल अमर कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला.

याप्रसंगी,ग्रंथमित्र कुंडलिक मोरे,राज्य ग्रंथालय संघाचे संचालक ग्रंथमित्र गुलाबराव पाटील,जिल्हा संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार,माजी उपसभापती राजाराम येलपले,कै.दमयंती डिकसळकर वाचनालयाच्या अध्यक्षा संगिता डिकसळकर व जितेंद्र डिकसळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
———————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button