आरोग्य

सांगोला नगरपरिषद व वेदांत हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 

सांगोला :

बचत गटातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सांगोला नगरपरिषद व वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांसाठी सोमवार दि.६ नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.

               सांगोला नगरपरिषद दि.अं.यो. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) ही केंद्र पुरस्कृत योजना राबवित असून सदर योजना ही शहरी दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सन २०१४-१५ पासून कार्यान्वीत झालेली आहे. योजनेच्या माध्यमातून शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने नगरपरिषद स्तरावर महिला बचत गटांची स्थापना करण्यात येते.त्या अनुषंगाने, शहरामध्ये सध्या, २०० पेक्षा जास्त बचत गट कार्यरत आहेत. या योजनेच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सदर शिबीरामध्ये महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून या शिबिरात महिलांची बी.पी., शुगर,हाडांचा ठिसूळपणा तपासणी व सी.बी.सी इ. तपासण्या होणार आहेत.सदर आरोग्य शिबीराचे आयोजन हे हॉटेल जयनीला येथे होणार असून या शिबिराचा लाभ बचत गटातील जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा,असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button