सांगोला :
महाराष्ट्र राज्य शासनाअंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ अंतर्गत जवळा (ता. सांगोला) येथे विविध कामांसाठी १ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी दिली.
या महामंडळाअंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्र,महुद अंतर्गत जवळा (ता.सांगोला) येथील क्षेत्रावर १०० शेळ्यांच्या क्षमतेच्या नवीन वाड्याचे बांधकाम करण्यासाठी ६० लाख रु.,शेळ्या-मेंढ्यांसाठी वैरण साठवणूक गोडाऊन तयार करण्यासाठी १० लाख ५० हजार रुपये,कार्यालय इमारत बांधकाम करण्यासाठी ११ लाख २५ हजार रुपये तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेले एक अधिकारी,वर्ग ३ चा एक कर्मचारी व वर्ग ४ चे ४ कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करण्यासाठी ७५ लाख रु.असे एकूण १ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिली.
मंजूर निधीतून या कामांना तात्काळ गती देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घेतले जाईल तसेच या कामासाठी आणखी कांही निधी आवश्यक असेल तर,याबाबत पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी खेचून आणू,असेही शेवटी माजी आमदार दीपकआबांनी स्पष्ट केले.
——————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन